Type to search

maharashtra धुळे

कामगार हा उद्योगाचा आत्मा! – डॉ.कलशेट्टी

Share

दोंडाईचा । कोणत्याही उद्योगसमुहात कामगार हा अत्यंत महत्वाचा घटक असतो तो तेथील आत्मा असतो त्याची जपणूक करण्याचे काम रावल उद्योग समूह स्थापन झाल्यापासून करीत असल्याचे मत नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केले.

दोंडाईचा येथील दादासाहेब रावल उद्योग समुहाच्या युनिव्हर्सल स्टॉर्च अलाईड लिमिटेड तर्फे तेथील कर्मचार्‍यांना दिवाळीनिमित्त बोनसचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी राज्याचे रोहयो व पर्यटनमंत्री ना. जयकुमार रावल, रावल उद्योग समुहाचे चेअरमन सरकारसाहेब रावल, नगराध्यक्षा नयनकुंवरताई रावल, ताईसाहेब जमादार, कुंवरराणी सुभद्रादेवी रावल, वेदांतेश्वरी रावल, जयअदीत्यसिंह रावल, कंपनीचे महाव्यवस्थापक जे पी चौधरी, मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. परमार आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना डॉ. कलशेट्टी म्हणाले की, 1973 मध्ये दोंडाईचा सारख्या भागात महाराष्ट्रातील पहिली तर भारतातील सातवी स्टॉर्च प्रकल्प उभारला ही या भागातील अत्यंत अभिमानास्पद बाब असून या भागातील शेतकर्‍यांच्या मालाला भाव मिळावा व या भागातील तरुणांना रोजगार मिळावा हा उदात्त हेतू यामागे त्यांचा होता. येथील कामगारांची शिस्त अत्यंत वाखाणण्याजोगी आहे. कामगारांचीही काळजी या ठिकाणी घेतली जाते. आज पर्यंत याठिकाणी एकदाही कामगारांकडून संप झालेला नाही. यातूनच त्या गोष्टींची प्रचिती येते. कोणत्याही उद्योगसमुहात कामगार हा अत्यंत महत्वाचा घटक असतो तो तेथील आत्माच असतो असे त्यांनी सांगितले.

राज्याचे रोहयो व पर्यटनमंत्री ना.जयकुमार रावल हे म्हणाले की, दिवाळीच्या सण हा कामगारांही गोड व्हावा म्हणून दिवाळी बोनस देण्याची परंपरा दादासाहेब रावल यांनी सुरू केली. ती परंपरा सरकारसाहेब रावल यांनी कायम ठेवली. कंपनीची आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी येथील कामगारांना न चुकता दरवर्षी दिवाळी बोनस दिला जातो तो यापुढेही असाच दिला जाईल असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक सरकारसाहेब रावल यांनी केले तर सुत्रसंचालन एस आर चौधरी यांनी केले. दरम्यान सालाबादप्रमाणे यंदा ही दादासाहेब रावल उद्योग समूहातील कामगार व कर्मचार्‍यांना 8.33 टक्के बोनस वाटप करण्यात आला तो एका महिन्याच्या पगारा एवढा मिळाला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!