Type to search

मालेगावजवळ सापडले एटीएम मशिन

maharashtra धुळे

मालेगावजवळ सापडले एटीएम मशिन

Share
धुळे । शहरातील मालेगाव रोडवरील अग्रसेन चौकातील आयसीआयसीआय बँकेचे चोरट्यांनी लांबविलेले एटीएम मशिन मालेगावजवळील धरणाजवळ आज सकाळी आढळून आले़ चोरट्यांनी हे मशिन गॅस कटरने कापून रोकड लंपास केली आहे. घटनास्थळी शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गणेश चौधरी हे पथकासह रवाना झाले आहेत़

शहरातील अग्रसेन चौकातील व्यापारी संकुलातील एका गाळ्यात असलेले आयसीआयसीआय बँकेच्या दोन एटीएम मशिनपैकी चोरट्यांनी चक्क एक मशिनच लंपास केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली होती़ या मशिनमध्ये 22 लाख 44 हजार 800 रुपयांची रोकडे व 3 लाख रूपये किंमतीचे एटीएम चोरट्यांनी चोरुन नेला होता. आतापर्यंत जिल्ह्यात एटीएम फोडल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र यावेळी चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच लांबविल्याची घटना जिल्ह्यात प्रथमच घडली आहे. त्यामुळे पोलिसांसमोर देखील तपासाचे आव्हान आहे. घटनेनंतर चोरट्यांच्या तपासासाठी पोलिस पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे़ ही पथके इंदूर, साक्री आणि मनमाड या दिशेने रवाना देखील झाली आहे.

चोरट्यांचा तपास सुरू असतांनाच आज सकाळी चोरट्यांनी लांबविलेले एटीएम मशीन हे मालेगावजवळील धरणाजवळ फेकलेले असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यानंतर निरीक्षक गणेश चौधरी यांच्यासह पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. दरम्यान चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएममशीलन कापुन त्यातील रोकड काढून एटीएम मशीन तेथे फेकुन दिले आहे. मशीनचे साहित्य विखुरलेले दिसून येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!