Type to search

maharashtra आवर्जून वाचाच देश विदेश धुळे मुख्य बातम्या

दुबईच्या राजकुमारांना सारंगखेड्याचे आमत्रंण

Share
मुंबई । संयुक्त अरब आमिरती दुबईचे राजकुमार शेख हमदान बीन मोहम्मद बिन राशीद अल मक्ततौम यांना सारंगखेड्याच्या चेतक महोत्सवाला येण्याचे निमंत्रण पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

नुकतीच शेख हमदान आणि रावल यांची दुबईत भेट झाली.यावेळी 400 वषार्ंची परंपरा असलेल्या सारंगखेडा घोडे बाजार, यात्रेची महती ऐकून राजकुमार शेख प्रभावित झाले.

गल्फ महाराष्ट्र बिझिनेस फोरमच्या वतीने दुबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या आंतरराष्ट्रीय बिझिनेस कॉन्फरन्स महाबिझ 2018 चे उदघाटन ना. रावल यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला आलेल्या शेख हमदान यांचे रावल यांनी स्वागत केले.

अरबांना घोड्यांबद्दल विशेष प्रेम आहे. महागडे, देखणे, रुबाबदार घोडे बाळगणे हा अरबांचा शौक मानला जातो. हाच संदर्भ घेऊन ना. रावल यांनी या भेटीत शेख यांना 400 वषार्ंची परंपरा असलेल्या सारंगखेडा घोडे बाजार, यात्रेची महती सांगितली. रावल यांच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर राजकुमार शेख प्रभावित झाले.

सारंगखेड्याची यात्रा आणि देशभरातुन तिथे आलेले घोडे पाहायला येण्याचा आपण नक्की प्रयत्न करू अस राजकुमार शेख यांनी यावेळी सांगितले.

पर्यटनस्थळ आणि व्यापार केंद्र म्हणून दुबईला जगात आघाडीवर आणणार्‍या दुबई वर्ल्ड ट्रेंड सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिलाल सैद अल मरी हे ही यावेळी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!