Thursday, April 25, 2024
Homeधुळेधुळ्यात कोरोनामुळे 57 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

धुळ्यात कोरोनामुळे 57 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

 जिल्ह्यातील मृतांची संख्या झाली दोन,”त्या”राजकीय व्यक्तीच्या संपर्कातील 64 पैकी 27 रिपोर्ट निगेटिव्ह

धुळे –

श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या अतीदक्षता विभागात आज पहाटे एका 57 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती शहरातील ताशा गल्लीतील रहिवाशी असल्याचे सांगितले जाते.

- Advertisement -

दरम्यान काल शहराच्या आमदाराशी संबंधित एका 42 वर्षीय राजकीय व्यक्तीला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास अति दक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्याशी संबंधित 64 जणांचे नमुने घेण्यात आले असून त्यापैकी 27 रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती अधीक्षक डॉ. राजकुमार सूर्यवंशी यांनी दिली.

धुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृतांची संख्या आता दोन झाली असून यापूर्वी साक्रीतील एका 53 वर्षाच्या व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर बधितांची संख्या 3 झाली आहे. या व्यतिरिक्त मालेगावच्या एका 22 वर्षीय तरुणीचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

शहरातील कोरोना बधितांची वाढती संख्या विचारात घेता प्रशासनाने शहरात दोन दिवस संपूर्ण लॉकडाऊन केले असून आता मध्य शहरातील पेठ भाग सील करण्यात येत आहे . काल 80 फुटी रस्त्यासह दीड किलो मीटरचा परिसर बफर झोन म्हणून जाहीर केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या