ग.स.बँकेत साडेपाच कोटींचा गैरव्यवहार

0

धुळे । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे आरबीआयच्या अटीशर्ती तुडवत व नियम धाब्यावर बसवून धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी बँक अर्थात ग.स. बँकेत पाच कोटी 49 लाखांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी बँकेचे गटनेते यांच्यासह 46 जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, ग.स.बँकेत सन 2008-9, 2009-10 व 2015-16 या आर्थिक वर्षात चार कोटी 44 लाख 53 हजार 205 रुपये तर एक कोटी चार लाख 65 हजार असा एकूण पाच कोटी 49 लाखांचा गैरव्यवहार झाला आहे.

याबाबत शहर पोलिस ठाण्यात सरकारी ऑडीटर वसंत प्रभाकर राठोड रा. आनंदनगर धुळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, बँक तोट्यात असतांना ती नफ्यात असल्याचे दाखविण्यासाठी बँकेचे तत्कालीन चेअरमन व गटनेते चंद्रकांत नारायण देसले, संचालक आणि अधिकार्‍यांनी संगणमत करुन कर्जाचे व्याज वसुल झालेले नसतांना चार कोटी 44 लाख 53 हजार 205 रुपये उत्पन्न दाखवून कर्जदारांच्या खात्यावर जमा केले व प्रत्यक्षात उत्पन्न मिळाल्याचे भासवून दिशाभूल करणारी आर्थिक पत्रके तयार केली.

ही खोटी आर्थिक पत्रक सहकार खाते, रिझर्व्ह बँक व बँकेच्या सर्वसाधारण सभेत सभासदांसमोर सादर करुन खरे असल्याचे भासवून फसवणूक केली. तसेच सन 2015-16 मध्ये बँकेने फेडरल, फायनाशिएल, कन्सल्ट कंपनी नाशिक यांच्याकडून एक कोटी चार लाख 65 हजार रुपये धनादेशाद्वारे पैसे देवून एटीएम मशिनच्या खरेदीपोटी ही रक्कम अदा केली. एटीएम खरेदीच्या बाबतीत रिझर्व्ह बँकेने परवानगी नाकारली असतांना व बंधने देखील ग.स.बँकेने अटी व शर्ती न पाळता बँकेच्या पाच कोटी 50 लाख 18 हजार 205 रुपयांचा गैरव्यवहार केला व सभासदांची फसवणूक केली. त्यांच्या फिर्यादीवरुन भादंवि 420, 465, 637, 471, 477 (अ), 34 प्रमाणे बँकेचे गटनेते चंद्रकांत देसलेंसह 46 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल झालेले संशयीत
गैरव्यवहार प्रकरणी बँकेचे गटनेते व तत्कालीन चेअरमन चंद्रकांत नारायण देसले, व्हाईस चेअरमन दारासिंग गोविंद वळवी, संचालक संजय सीताराम कुवर, देवीदास भटा पाटील, सुरेश गोरख माळी, अशोक गुलाबराव पवार, उमाकांत लक्ष्मण बिरारीस, किशोर शामराव सोनवणे, मनोहर लोटन पाटील, राजेंद्र वसंतराव पाटील, निशांत विश्वासराव रंधे, दत्तात्रय अनंत शिंदे, संजय वेडू शिंदे, शरद काशिनाथ सूर्यवंशी,

किरण रामचंद्र दाभाडे, रवींद्र पुनमचंद सैंदाणे, दिलीप यशवंत वाघ, इंदास कातुड्या गावीत, राजेंद्र फत्तेसिंग सूर्यवंशी, श्रीमती शोभा लोटन पवार, श्रीमती छाया रामचंद्र पाटील, श्रीमती क्रांती पोपट जाधव, भैय्यासाहेब संजय वेडू शिंदे, संजय लोटन पवार, जवाहर रसाल पवार, प्रा. शाम साहेबराव पवार, विजयकुमार आनंदराव दहिते, वसंत निंबादास देवरे, मधुकर देवराम पाटील, तात्यासाहेब चिंधा पवार, चंद्रकांत रमेश सत्तेसा, निंबा मोहन माळी, राजेश वामनराव माईनकर, जनरल मॅनेजर रमेश यशवंत पवार, अकाऊंट मॅनेजर मच्छींद्र मगन पाटील, रवींद्र हिंमतराव पाटील, देवीदास वेडू पवार, वसंत उखाजी बिरारीस, अशोक भास्कर मोरे, जिजाबराव पहाडू पाटील, मुरलीधर नामदेव माळी, दिलीप बाबुराव भदाणे, विकास वसंत माळी, आनंदा बाबुराव बेहेरे आणि लक्ष्मण अर्जुन अहिरराव या 46 संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*