नगाव येथे चौघांना डेंग्यूसदृश आजाराची लागण

0
कापडणे । येथे डेंग्यूने पुन्हा एकदा डोके वर काढले असून येथील तिघांना डेंग्यूसदृश्य आजाराची लागण झाली आहे. धनश्री अनिल पाटील (वय 14), क्रांती विजय पाटील (वय 6), गणेश मनोहर पाटील (वय 10), सुमित प्रकाश पाटील (वय 11) या चारही रुग्णांवर धुळ्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

यातील धनश्री अनिल पाटील ही नववीची विद्यार्थ्यीनी गेल्या आठ दिवसांपासून धुळ्यातील एका खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी तिला मुंबईला हलविण्यात येणार असल्याचेही समजते.

येथे गेल्या महिन्यातही सुमारे चार डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते. डेंग्यूने पुन्हा डोके वर काढल्याने ग्रामस्थामध्ये भितीचे वातावरण पसरले आले. स्थानिक आरोग्य यंत्रणा व ग्रामपंचायत मात्र यावर उपाययोजना करण्यात सपशेल अपयशी ठरत आहे.

येथे डेंग्यू सदृश्य आजाराने पुन्हा डोकेवर काढले असून आरोग्य यंत्रणा व ग्रा.पं.आपली बोटचेपी भूमिका मात्र सोडतांना दिसत नाही. गावात घाणींचे साम्राज्य पसरले आहे. डासांचे प्रमाण वाढल्याने गावात धुरळणी करण्याची जोर धरु लागली आहे. जनतेच्या जीवाशी खेळणार्‍या येथील आरोग्य यंत्रणेवरच आता वरिष्ठ यंत्रणेने कायदेशिर बडगा उगारण्याची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे.

या चारही रुग्णांना दहा दिवसांपासून तापाची लक्षणे आढळून येत होती. नगाव येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, डेंग्यू सदृश्य आजाराची लक्षणे आढळून आल्याने त्यांना धुळे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. डेंग्यूची प्राथमिक रक्त चाचणी करण्यात आली असून त्यात त्यास डेंग्यूसदृश्य आजार निष्पन्न झाला असून लवकरच त्याची पुढील चाचणी करण्यात येणार आहे.

सध्या त्यातील तिघांची प्रकृती स्थिर असून एक रुग्ण अत्यवस्थ अवस्थेत आहे. येथे सुमारे प्रत्येक महिन्यास एक-दोन डेंग्यूसदृश्य आजाराचे रुग्ण आढळत असल्याचे ग्रामस्थांतून बोलले जाते तरीही आरोग्य यंत्रणा मात्र सुस्त आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या यंत्रणेने याबाबत दक्ष होणे गरजेचे आहे. असे असतांना येथील आरोग्य यंत्रणा मात्र कोणती घटना घडण्याची वाट पाहत आहे. याबाबत गावात संताप व्यक्त केला जात आहे. डेंग्यूसदृश्य आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.

गावात गृहभेटी, सर्व्हक्षण, अ‍ॅबेटींग, प्रबोधन आदी उपाययोजना होणे गरजेचे आहे. या साथीच्या आजारांसारख्या प्रश्नाकडे केवळ कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून न पाहता हा विषय गांर्भियाने घेणे गरजेचे आहे. वेळकाढू धोरण अवलंबणार्‍या येथील आरोग्य यंत्रणेच्या या बोटचेपी धोरणाविषयी लवकरच वरिष्ठ पातळीवर निवेदन देण्यात येणार आहे.वर्षभरात अनेक डेंग्यूसदृश्यचे रुग्ण आढळल्यानंतरही प्रा.आ.केंद्र आपली ढिम्म भूमीका सोडायला तयार नाही.

या अक्षम्य वेळकाढू धोरणांविषयी ग्रामस्थांतून रोष व्यक्त करण्यात येत असून हा जीवघेणा खेळ थांबविण्याची मागणी होत आहे. येथील धनश्री अनिल पाटील ही नववीची विद्यार्थ्यीनी गेल्या 7-8 दिवसापासून धुळ्यातील एका खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला पुढील उपचारासाठी मुंबईला हलविण्यात येणार असल्याचेही समजते.

LEAVE A REPLY

*