खान्देश व्यापारी संघटनेची स्थापना

0
????????????????????????????????????
धुळे । धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील व तालुका अंतर्गत बाजार समिती मधील व्यापारी प्रतिनिधींची दि धुळे मर्चंट कमिशन एजंट असोसिएशनचे प्रमोद जैन यांच्या अध्यक्षतेखाली व्यापारी परिषद आज घेण्यात आली. त्यात तिन्ही जिल्ह्यातील व्यापार्‍यांची खान्देश व्यापारी संघटना (33 बाजार समिती व्यापारी अंतर्गत) स्थापन करण्यात आली.

त्यात प्रथम अध्यक्ष म्हणून विजय चिंचोले, धुळे, कार्याध्यक्ष भरत शेंडे,पाचोरा, उपाध्यक्ष राहुल कवाड, दोंडाईचा, किशोरभाई वाणी, नंदुरबार, हरीभाऊ वाणी, अमळनेर, सेक्रेटरी युवराज जैन, शिरपूर, सहसेक्रेटरी अनिलभाऊ वाणी, खजिनदार कैलासशेठ अग्रवाल, शिरपूर, समन्वय व संचालक प्रमोद जैन, धुळे व सभासद मोहन पाटील, शिरपूर, रमेश लखोटे, दोंडाईचा, वर्धमान जैन, दोंडाईचा, अमित लखोटे, शिंदखेडा, प्रवीण बागड, चाळीसगाव, गणेश बडगुजर, एरंडोल, संजय शाह, जळगाव, किशोर येवले, धरणगाव, प्रमोद छाजेड, चोपडा,

जितेंद्र शेवतकर, पारोळा, मुकेश अग्रवाल, पाचोरा, पंकज जैन,साक्री, महेश जैन नंदुरबार, शैलेश मंत्री, कासोदा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यापुढे कुठल्याही बाजार समितीत व्यापार व्यवहारात अडचणी आल्यास संघटनेच्या माध्यमातून लढा दिला जाईल. व हमीभाव संदर्भात स्थानिक जिल्हाअधिकारी, उपनिबंधक व बाजार समिती प्रशासन व व्यापारी यांची संयुक्त बैठक घेऊन व्यापार्‍यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही अशी हमी घेण्यात यावी व मगच व्यापार व्यवहार सुरळीतपणे सुरू होतील असा ठराव करण्यात आला. या परिषदेस धुळे, जळगाव, नंदुरबार या तीनही जिल्ह्यातील 33 बाजार समिती मधील 450 व्यापारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*