धुळे येथे पत्नीची हत्त्या करुन पतीचा आत्महत्त्येचा प्रयत्न

0
धुळे । शहरातील सुरत बायपास महामार्गावर सुरु असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी पतीने पत्नीवर फावड्याने वार करुन पत्नीची हत्त्या केली. त्यानंतर त्याने स्वत: आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला. त्यात तो जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, सुरत बायपासवर चक्करबर्डी भागात बांधकाम सुरु आहे. तेथे पश्चिम बंगालमधून आलेला सुरेंद्र बारकू सोरेन (वय37) व त्याची पत्नी संजीली (वय30) हे दाम्पत्य मजूरी करतात. हे दाम्पत्य बांधकाम ठिकाणी पत्र्याच्या दहा बाय दहाच्या खोलीमध्ये राहतात. आज सकाळी 7.30 वाजता दाम्पत्यात वाद झाला. या वादाचे पर्यावसन मारहाणीत झाले. सुरेंद्रने फावड्याने हल्ला करुन संजीनीला ठार केले.

हा वाद सुरु असल्यामुळे आजूबाजूचे कामगार तेथे धावून आले. मात्र सुरेंद्रने दरवाजाला आतून कडी लावल्यामुळे काहीच कळू शकले नाही. पत्नीची हत्त्या केल्यानंतर सुरेंद्रने स्वत:वर देखील धारदार हत्याराने वार करुन घेतले. त्यात तो जखमी झाला व त्याने मार डाला, मार डाला अशी आरडाओरड केली.

त्यामुळे तेथे कामगार धावून आले. सुरेंद्रला उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर संजीलीचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*