धनुर येथे आज ई-लर्निंग क्लासरुमचे उद्घाटन

0

कापडणे । धनुर (ता.धुळे) येथे उद्या दि.7 रोजा ई-लर्निंग क्लासरुमचा उद्घाटन सभारंभ आयोजित करण्यात आला आहे. धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील हे या कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणुन उपस्थित राहणार असुन विविध मान्यवर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत.

धनुरचे दिवंगत माजी सरपंच शिवाजीराव नथ्थू पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित या कार्यक्रमात आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त सतिष शिंदे यांचा सत्कारही करण्यात येणार आहे. उपस्थितीचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

धनुर येथील जि.प.शाळेच्या प्रांगणात होणार्‍या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कापडणे ग्रा.पं.चे गटनेते व धुळे तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भगवान विनायक पाटील हे राहणार आहेत.तर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून धुळे जिल्हा परिषदचे समाज कल्याण सभापती मधुकर गर्दे, धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किर्तीमंतराव कवठळकर, सोनगीरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे,पंचायत समिती सदस्य मुकेश पवार, मणीलाल पाटील माजी पंचायत समिती सदस्य, धनुरचे माजी सरपंच अशोक पाटील,

हिरामण चौधरी, सुनंदा पाटील, कापडणे सरपंच भटू पाटील, हेंकळवाडीचे माजी सरपंच कांतीलाल पाटील,तामसवाडी उपसरपंच सतिष पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील, देवभाने माजी सरपंच प्रा.संजय देसले, धनुरचे ग्रा.पं.सदस्य साहेबराव कोळी, उपसरपंच विजय चौधरी, सदस्य योगेश भामरे, धर्मराज पाटील,ग्रामविस्तार अधिकारी भारती भामरे, शालेय समिती अध्यक्ष भटू पाटील, केंद्र प्रमुख मधुकर खैरनार हे असणार आहेत. धनुरचे तब्बल 31 वर्ष सरपंचपद भूषविलेले दिवंगत माजी सरपंच शिवाजीराव नथ्थू पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित या कार्यक्रमात ई-लर्निंग क्लासरुमचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी सतिष शिंदे यांचा सत्कारही करण्यात येणार आहे. धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक कैलास शिवाजी पाटील, राजेंद्र शिवाजी पाटील, डॉ.संदीप शिवाजी पाटील, चेतन शिंदे, हिंदवी स्वराज्य गृप धनूर- लोणकुटे तसेच मुख्याध्यापक व शिक्षक वृंद जि. प. शाळा धनूर आदी प्रयत्नशील आहेत.

LEAVE A REPLY

*