Type to search

Breaking News maharashtra धुळे

धुळ्यात पुर्ववैमनस्यातून दोन गटात हाणामारी

Share

धुळे  – 

शहरातील साक्री रोड परिसरात पुर्ववैमनस्यातून आज सायंकाळी दोन गटात तुफान हाणामारी झाली. त्यात तलवारीसह लाठ्या काठ्यांचा सर्रासपणे वापर करण्यात आला. त्यात नगरसेवक बन्सी जाधव यांच्यासह दोन्ही गटातील पाच जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

जखमींना हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेमुळे साक्री रोड परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

शहरातील साक्रीरोडील भिम नगरजवळ माजी नगरसेवक  पुत्र आणि विद्यमान नगरसेवक बन्सी जाधव यांच्या गटात सायंकाळी वाद झाला. त्यानंतर वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले.

काहींनी दुकानाच्या काच  फोडून नुकसान केले. हाणामारीत तलवारीसह लाठ्या काठ्यांचा सर्रासपणे वापर करण्यात आला. त्यात नगरसेवक बन्सी जाधव यांच्यासह किरण धिवरे, तुषार धिवरे, प्रविण धिवरे, प्रविण शिरसाट, आकाश अहिरे  हे जखमी झाले.

तसेच माजी नगरसवेकांच्या गटातील देखील काही जण जखमी झाल्याचे कळते. जखमींना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेदरम्यान साक्री रोड परिसरात नागरिकांची एकच पळापळ झाली. तसेच व्यावसायीकांची देखील धांदल उडाली. अनेक व्यावसायींकांनी दुकाने बंद केली. त्यामुळे साक्री रोडवरील वाहतूक देखील मंदावली होती. तर नागरिकांनी गर्दी केली होती. घटनेनंतर साक्री रोडपरिसरात शुकशुकटा दिसून आला. तसेच नागरिकांसह व्यापार्‍यामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिस दाखल, बंदोबस्त तैनात

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी पाहणी करून संशयीतांचा शोध सुरू केला. घटनास्थळी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

महिलांची निदर्शने

हाणामारीत माजी नगसेवक गटातील काही जण जखमी झाले आहेत. त्यांना मारहाण करणार्‍यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी माजी नगरसेवक गटाकडून महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत निदर्शने केली.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!