गंगामाई महाविद्यालयात स्वच्छ भारत अभियानांतर्गत विविध कार्यक्रम

0
कापडणे । नगाव ता.धुळे येथील गंगामाई वरिष्ठ महाविद्यालयात स्वच्छ भारत अभियानांतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात आले. राष्टीय सेवा योजनेतंर्गत विविध ठिकाणी स्वच्छता मोहिम राबवित स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.

भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांत महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे. राष्ट्रीयस्तरावर या अभियानाची दखल घेतली जात आहे. स्वच्छ भारत अभियान या मोहिमेचे मुख्य ध्येय म्हणजे सर्व शहरे आणि गावे हागणदारीमुक्त करणे. यासोबतच, स्वच्छ भारत अभियानाचा उद्देश भारतातील रस्ते व पायाभूत सुविधांची स्वच्छता करणे हाही आहे. या मोहिमेविषयी सर्वोत्तम गोष्ट म्हणजे सर्व शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये स्वच्छतेसंबंधीच्या विषयावर लक्ष केंद्रित करणे ही आहे.

स्वच्छ भारत अभियान हा खुप मोठा प्रकल्प आहे आणि 30 लाखापेक्षा अधिक सरकारी कर्मचारी तसेच शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या मोहिमेत भाग घेतला आहे अशी माहिती यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या महिला कार्यक्रम अधिकारी सौ.एस. डब्ल्यू. मोरे यांनी दिली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी आर.व्ही.पाटील, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी अंजीर सोनवणे आदींनीही मनोगत व्यक्त केले.

आपले महाविद्यालय स्वच्छ व सुंदर दिसावं यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजनेतंर्गत महाविद्यालयाच्या परिसरात स्वच्छता करण्यात येते. स्वच्छतेचा संदेश देत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ.पी.एन.पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी आर.व्ही.पाटील, राष्ट्रीय सेवा योजना सहाय्यक कार्यक्रम अधिकारी अंजीर सोनवणे, महिला कार्यक्रम अधिकारी शारदा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक अक्षय पाटील, गणेश मोरे, गौरव वाघ, किरण साळवे, विशाल ठाकूर आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात शेवटी आभार अक्षय पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

*