आम्ही धुळेकरतर्फेदोन विद्यार्थिनींना शिक्षणासाठी आर्थिक मदत

0

धुळे । शहरातील आम्ही धुळेकर संघटनेतर्फे दोन गरीब विद्यार्थीनींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली.

दि.11 ऑगस्ट रोजी संघटनेच्या संपर्क कार्यालयात एक विधवा तिच्या दोन लहान चिमूकल्या मुलींना घेवून आली. त्या महिलेने धनंजय गाळणकर यांना सांगीतले की मी या मुलींचा शिक्षणाचा खर्च पेलू शकत नाही व त्याचवेळी तिने त्या बालिकांच्या अंगावरील फाटलेला गणवेष देखील दाखवला.

घरची परिस्थीती बेताचीच असल्याने उत्पन्नाचा कोणताही स्त्रोत तिच्याकडे उपलब्ध नसल्याने मुलींचे शिक्षणच काय तर दोन वेळचे जेवणही मिळणे कठीण झाले आहे. एकतर माझ्या मुलींना कुठेतरी बोर्डींगमध्ये टाकून द्या. नाही तर काहीतरी काम लावून द्या अशी विनंती केली. त्या मुलींचे वय सहा व सात वर्ष असून मोठी मुलगी सेंट अँना स्कुलमध्ये चौथीला तर लहान मुलगीही बाफना प्राथमिक शाळेत दुसरीत शिक्षण घेत आहे.

धनंजय गाळणकर यांनी त्यांची कैफीयत ऐकल्यानंतर गाळणकर यांनी मुलींच्या शिक्षणासाठी संघटनेच्या वतीने मदत देण्याचे आश्वासन दिले. त्याप्रमाणे संघटनेच्या वतीने दानशुर व्यक्तींना आवाहन करण्यात आले.त्या आवाहनास प्रतिसाद देवून नगरसेवक सोनल शिंदे तसेच पाचकंदिल परिसरात लोटगाडीवर फळविक्री करणारे व सामाजिक कार्यकर्ते सलमान तांबोळी या दोघांनी त्या चिमुकल्यांच्या शैक्षणीक मदतीसाठी आर्थीक मदत दिली.

त्यापैकी बाफना शाळेत जावून मुख्यध्यापिका श्रीमती गोसावी, श्रीमती बुवा व श्रीमती अनिता पाटील यांच्या उपस्थितीत सदर बालिकेस आम्ही धुळेकरतर्फे आर्थीक मदत देण्यात आली. याप्रसंगी धनंजय गाळणकर, सलमान तांबोळी मुकूंदराव शिरसाठ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*