कोळी समाजातर्फे रास्तारोको

0
धुळे । विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून उपोषणाला बसलेल्यांची दखल न घेतल्यामुळे आज महामार्गावर कोळी समाजातर्फे रास्तारोको केला.

टोकरे कोळी युवामंचतर्फे जात प्रमाणपत्राची प्रकरणे त्वरित मंजुर करावीत व दाखले मिळावेत तसेच दाखल्यांवर जातीची नोंद करण्यात यावी या मागणीसाठी दि.25 जून पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. तर दि.26 जून रोजी अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.

आंदोलन सुरु होवून तीन दिवस उलटले तरी प्रशासनाने दखल घेतली नाही. उपोषण कर्त्यांची प्रकृती खालावली पण प्रशासनाने दखल घेतली नाही. याचा निषेध म्हणून आनंदखेडा येथील कोळी समाजाने महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. यामुळे हेंद्रुणकडे जाणार्‍या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. या आंदोलनात शांताराम साहेबराव नवसारे, राजेंद्र मालजी नवसारे, संतोष नथ्थू नवसारे, हेमराज तुकाराम जाधव, नरेंद्र रघुनाथ नवसारे, राजेंद्र दगडु नवसारे, निर्मलाबाई गुलाब माळी यांच्यासह अन्य समाजबांधव सहभागी झाले होते.

आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावली
विविध मागण्यांसाठी टोकरे कोळी युवामंचतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.25 जून पासून आमरण उपोषण आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या आंदोलनातील आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावल्याने प्रशासनातर्फे त्यांची तपासणी करण्यात आली. दोन आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

*