Type to search

धुळे राजकीय

कुसुंबा येथील शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

Share

धुळे । माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तथा खा.डॉ.सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील अनेक मातब्बरांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

रविवार खा.डॉ.सुभाष भामरे यांचे कार्यालय येथे हा प्रवेश सोहळा झाला. यावेळी धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील कुसुंबा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अविनाश रामचंद्र शिंदे, धुळे तालुका कॉग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रा.डॉ. दत्तात्र नीलकंठ परदेशी, कुसुंबा येथील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब संग्राम गोविंदराव पाटील, कुसुंबा येथील माजी सरपंच किशोर राजाराम शिंदे, कुसुंबा ग्राम पंचायत सदस्य किशोर संतोष शिंदे व सौ.संज्योत किशोर शिंदे, सौ.राजश्री पवार, राजेंद्र परदेशी, सुनिता किशोर शिंदे, अंकुर कर्णबधीर संस्थेचे चेअरमन ज्ञानेश्वर शार्दुल, राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीस श्रीकांत चौधरी, मोतीलाल कौतिक चौधरी, फकीर नथ्थू चौधरी, राजू अहिरे, पंडित भिल, सतीश अहिरे, यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी खा. डॉ.सुभाष भामरे, जिल्हाध्यक्ष तथा म्हाडा उपसभापती बबनभाऊ चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सुभाष देवरे, मनोहर भदाणे, किशोर सिंघवी, प्रा.अरविंद जाधव, बापू खलाणे, राम भदाणे, तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!