कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीतर्फे रास्तारोको

0
????????????????????????????????????
धुळे । सर्व क्षेत्रांमध्ये सर्व प्रकारच्या कामगार कष्टकर्‍यांना दरमहा कमीत कमी 18 हजार रुपये किमान वेतन लागू करा व ते महागाई निर्देशांकाशी जोडा यासह अन्य मागण्यांसाठी आज शहरात कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीतर्फे आज दि. 9 जानेवारी रोजी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

दहावी राष्ट्रीयस्तरावरील कामगार संघटना व विविध क्षेत्रातील कर्मचार्‍यांच्या फेडरेशन कामगार कष्टकर्‍यांच्या बारा मागण्यांसाठी देशव्यापी संप करण्यात आला होता. परंतु शासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे दि. 8 व 9 जानेवारी रोजी संप पुकारण्यात आला आहे. या संपात बँक कर्मचारी, बीएसएनल, टपाल, विमा कंपन्यांचे कर्मचारी सहभागी झाले आहेत.

शहरानजीक पारोळारोड येथे रास्तारोको करण्यात आला. यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. या आंदोलनात कॉ. हिरालाल सापे, कॉ. संजय गिरासे, काँग्रेस इंटकचे उपाध्यक्ष प्रमोद सिसोदे, कॉ. एस.यु.तायडे, कॉ. राजेंद्र चौरे, कॉ. शाहीद खाटीक, कॉ. एल.आर. रावल, कॉ. संजय चव्हाण, कॉ. पोपटराव चौधरी, कॉ. राजेश कुलकर्णी यांच्यासह शेकडो कामगार सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

*