धुळ्यात 29 जूनला रोजगार मेळावा

0
धुळे । दि.22 । प्रतिनिधी-जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय तांत्रिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 29 जून 2017 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय तांत्रिक विद्यालयात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भै.गो.येरमे,सहाय्यक संचालक, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.
श्री. येरमे यांनी म्हटले आहे, या रोजगार मेळाव्यासाठी उद्योजकांकडून सुमारे 350 रिक्तपदे कळविण्यात आलेली आहेत.

जिल्ह्यातील विविध कंपन्यांमध्ये ही पदे रिक्त असून मेळाव्यासाठी येताना उमेदवारांनी सोबत सेवायोजन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, आधार कार्ड तसेच शैक्षणिक प्रमाणपत्राच्या प्रती, पासपोर्ट फोटो आणावेत. 29 जून 2017 रोजी होणार्‍या पर्याय निवडून क्लिक करावे, आपल्या पात्रतेनुसार पदाची निवड करुन क्लिक करावे, आणि निवडून या बटनावर क्लिक करावे.

त्यानंतर आपणास मेळाव्यात सहभागी झाल्याचा एसएमएस प्राप्त होईल. उमेदवारास कोणत्याही पदासाठी अर्ज करता येईल, असेही श्री. येरमे यांनी नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

*