Type to search

धुळे

भामपूर येथे पावसामुळे लाखोंचे नुकसान

Share

तर्‍हाडी । वार्ताहर – शिरपूर तालुक्यातील भामपूर गावात सोमवारी रात्री मुसळधार पाऊस झाला.पावसात सुमारे सात ते आठ गुरे वाहून गेली आहेत.तसेच बैलगाडेही वाहून गेली.भामपूर गावातील नाल्याच्या काठावर बांधलेली गुरे वाहून गेली. लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

सोमवारी मध्यरात्रीनंतर बारा ते तीन वाजेच्या सुमारास भामपुर परिसरात मुसळधार पाऊस झाला. या पावसात नवे भामपूर येथील काठेवाड लोकांच्या वीस गायी व मोठ्या प्रमाणावर चारा वाहून गेला. तर जुने भामपूर येथे एक गाय, दोन म्हैस, तीन बैल, दोन वासरू असे आठ गुरे वाहून गेले आहेत. नाल्याच्या काठावर असलेल्या गुरांचा चारा, शेतकर्‍यांचे शेतीसाठी वापरण्यात येणारे अवजारे तसेच गुरे वाहून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे शेतकर्‍यांना आपली गुरे व शेती अवजारे पाण्यातून वाचवण्याची कोणत्याही प्रकारची संधी मिळाली नाही. तसेच मध्यरात्रीनंतर झालेल्या या पावसामुळे शेतकरी आपल्या जनावरांसाठी काही करू शकले नाही.

40 वर्षात प्रथमच असा पाऊस झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यात महिला शौचालयाची संरक्षण भिंतही जमीनदोस्त झाली आहे.तर वाघाडी ते विखरण परिसरात शेती पाण्याखाली गेली आहे.

या पावसात जुने भामपूर येथील गोपीचंद चिंतामण पाटील यांच्या दोन म्हैस, साहेबराव चैत्राम पाटील यांचे दोन बैल, प्रकाश मोरचंद पाटील यांचा एक बैल, संतोष चैत्राम पाटील व नंदू भिला कोळी यांचेही शेतीची अवजारे व चारा वाहून गेला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!