Type to search

धुळे

चालकाला जागेवरच मिळणार कारवाईची प्रिंट

Share

धुळे । केद्र शासनाच्या डिजीटल इंडीया या संकल्पनेतुन महराष्ट्र राज्यात मोटार वाहन कायद्याची अंमलबजावनी करतांना कारवाईमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी व वाहन चालकांवर डिजीटल चलानाद्वारे कारवाई करण्यासाठी राज्यामध्ये एक राज्य एक चलान ही योजना राबविण्यात येत आहे.ही यंत्रणा कॅमेरा रेकॉर्डंग पुराव्यासह परीपुर्ण असल्याने व यामध्ये किमान मानवी हस्तक्षेप असल्याने अधिक पारदर्शकता आहे. शहरातही आता या प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.

यापुर्वी महाराष्ट्र पोलीस दलातर्फे मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करतांना होत असलेला जी.ई.एन.पावतीचा वापर बंद करण्यात येत असुन ई चलान वन स्टेट वन चलान ही प्रणाली राबविण्यात येत आहे. या प्रणालीत पोलिसांकडुन ई चलान मशिनचा वापर करुन दंड वसुल करण्यात येणार आहे. कारवाई करण्यात आलेल्या वाहन चालकाला जागेवर कारवाई झाल्याची प्रिंट प्रत दिली जाणार असुन त्याच्या मोबाईल क्रमांकावर देखिल कारवाईची सविस्तर माहिती लागलीच एसएमएसद्वारे प्राप्त होणार आहे. ई चलाने प्रणालीत दंड हा एटीएमव्दारे भरणा करण्याची देखिल सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. ज्या वाहन चालकांकडे रोखीने पैसे भरण्यासाठी नसतील, असे वाहन चालक आपल्या दंडाची रक्कम एटीएमकार्ड व्दारे स्वाइप करु शकतात. या कार्यप्रणालीमुळे रस्त्यावर वाहनचालक व वाहतूक पोलीस यांच्यामध्ये होणार्‍या वादाला आळा बसणार असुन वाहनचालकामध्ये शिस्त वाढीस लागुन अपघातांना आळा बसेल. अशी माहिती शहर वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक पी.व्ही. मुंडे यांनी दिली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!