युवकाची गळफास घेवून आत्महत्त्या

0
धुळे । शहरातील नारायणमास्तर चाळमध्ये राहणार्‍या युवकाने राहत्या घरी छताच्या कडीला साडीच्या साह्याने गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात प्रथमदर्शी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील नारायणमास्तर चाळ येथे राहणारा यश अशोक अहिरे (वय 18) याने दि.13 जून रोजी रात्री 9.30 वाजता राहत्या घरी छताच्या कडीला साडीच्या साह्याने गळफास घेवून आत्महत्या केली. त्याला जखमी अवस्थेत त्याच्या नातेवाईकांनी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले.

तेथे डॉ. नितीन पवार यांनी तपासून यश अहिरेला मृत घोषित केले. याबाबत कमलेश काशिनाथ पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ. व्ही.यु.जाधव हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

*