नुकसानग्रस्त कुटूंबाला 11 हजाराची मदत

0
शिरपूर । तालुक्यातील विखरण येथील संभाजी राजाराम पाटील यांच्या घराला गॅस स्फोटामुळे आगीत संसारोपयोगी साहित्यासह संपुर्ण भस्मसात झाले.या दुर्घटनेत संभाजी पाटील यांचे घरसंसार पुर्णपणे जळुन खाक झाले होते.

या कुंटूबाच्या मदतीसाठी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी हे धज्ञावून आले. त्यांनी विखरण येथे संभाजी पाटील यांना रोख 11 हजार रुपये मदत दिली व जळीत घराची पाहणी केली.

याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा सोबत जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, मिलिंद पाटील, संजय आसापुरे, चंद्रकांत पाटील, आबा धाकड, शहराध्यक्ष हेमंत पाटील, सुरेश भील, तालुका उपाध्यक्ष मंगेश भदाणे, चिटणीस निलेश देशमुख, शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, चिटणीस राधेश्याम भोई, युवामोर्चा शहराध्यक्ष विक्की चौधरी,

व्यापारी आघाडी शहराध्यक्ष नंदु माळी, विखरण शालीक पाटील, रविंद्र पाटील, संतोष शिंदे, छोटु अहिरे, नितीन धनगर, गंभीर लोहार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*