आयएमआरडी परिसंस्थेच्या प्रा.मनोज पटेल यांना पीएच.डी.

0
शिरपूर । येथील आर.सी.पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचालित आयएमआरडी परिसंस्थेतील प्राध्यापक तसेच एमएमएस विभागप्रमुख मनोज पटेल यांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव या विद्यापीठाने वाणिज्य व व्यवस्थापन या विभागाअंतर्गत डॉक्टरेट पदवी प्रदान केली. स्ट्रॅटेजिक मॉडेल फॉर इम्पलेमेंटेशन ऑफ मोबाइल इन्मोरमेशन सिस्टेम इन पंचायत राज हा त्यांचा संशोधनाचा विषय होता.त्यांना प्रा.डॉ.मंगला ए. साबद्रायांचे मार्गदर्शन लाभले.

प्रा.मनोज पटेल यांचे संशोधन राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय दर्जाच्या शोधपत्रीकेत प्रकाशित झाले असून अनेक परिसंवाद व परिषदांमध्ये त्यांनी सक्रीय सहभाग नोंदविला आहे. प्रा.मनोज पटेल यांनी त्यांच्या पीएच.डी. दरम्यान अविष्कार-2015 मध्ये याच विषयावर रिसर्च पोस्टर सादर करुन वाणिज्य व व्यवस्थापन विभागाअंतर्गत शिक्षक गटांतुन प्रथम पारितोषिक प्राप्त केले आहे.

प्रा.मनोज पटेल यांच्या यशाबददल आ.अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन पटेल, संस्थेचे अध्यक्ष तसेच उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, संस्थेचे चेअरमन राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकर चव्हाण, संचालक डॉ.के.बी.पाटील परिसंस्थेच्या संचालिका डॉ.वैशाली पाटील, एम.सी.ए. विभागप्रमुख प्रा.मनोज बेहेरे, पदवी विभागप्रमुख प्रा.तुषार पटेल यांनी कौतूक केले.

LEAVE A REPLY

*