पाटचारीचे काम लोकसहभागातून पूर्ण

0
धुळे । न्याहळोद शिवारापासून ते कौठळ पर्यंत सहा किमी अंतराची पाटचारी बर्‍याच वर्षापासून नादुरुस्त होते. या पाटचारी बर्‍याच वर्षापासून दुरुस्तीची मागणी होत होती. या पाटचारीच्या दुरुस्ती कामास धुळे ग्रामीणचे शिवसेनेचे विधानसभा संघटक नितीन पाटील यांनी पुढाकार घेऊन या कामास सुरवात केली व लोकसहभाग देखील मिळविला. या कामाची सुरवात दि.7 जुन रोजी करण्यात आली होती.

सदर कामाचे उद्घाटन जेष्ठ नागरीक विश्वास पुंडलीक भामरे यांच्या हस्ते करण्यात येऊन आज रोजी काम पूर्ण झाले आहे. या पाटचारीत बिलाडी येथील शिवकालीन बंधार्‍यातून व कौठळ येथील केटीवेअर येथे लोक सहभागातून झालेल्या लिफ्टद्वारे पाणी सोडण्यात येणार आहे.

सदर सहा किमी अंतराच्या पाटचारीच्या दुरुस्तीच्या कामासाठी सरपंच बुधा मोरे, नरेंद्र पाटील, ग्रा.पं.सदस्य भैय्या पाटील, महेश भामरे, भीमा बापू, भरत भामरे, सुधाकर कोळी, योगेश पाटील यांच्यासह अनेक शेतकर्‍यांनी कामासाठी सहकार्य केले.

सदर काम न्याहळोद शिवारातून कौठळ शेती शिवारापर्यंत करण्यात आले असून सदरचे काम तामसवाडी सारण्या नाल्यापर्यंत करण्यात आले आहे. या पाटचारीमुळे कौठळ व तामसवाडी येथील शेतकर्‍यांना लाभ मिळणार असून 500 हेक्टर जमीन ओलीखाली येणार आहे. सदर काम पूर्ण झाल्या मुळे शेतकर्‍यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

*