मनपा शाळांची होणार दुरुस्ती, प्रस्ताव सादर

0
धुळे । महापालिकेच्या शाळांची दुरावस्था झाली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने अशा शाळांची तत्काळ दुरूस्ती करावी, अशी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे मनपा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. अन्यथा तिव्र आंदोलनाचाही इशारा देण्यात आला होता.

याची दखल घेत मनपा प्रशासनाने मनपाचया शाळा दुरूस्ती करण्याचा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी सादर केला आहे. मंजुरीअंती शाळांची दुरूस्ती करण्याचे लेखी आश्वासन मनविसेला दिले आहे अशी माहिती मनविसेचे जिल्हा सरचिटणीस प्रसाद देशमुख यांनी दिली आहे.

महापालिकेच्या शाळांमध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळांच्या इमारतींची अनेक वर्षांपासून दुरुस्ती करण्यात आलेली नाही, त्यामुळे अनेक शाळांच्या इमारतींची दुरवस्था झालेली आहे. अनेक शाळांचे छत पावसाळ्यात गळते. काही शाळांच्या भिंतीही जीर्ण झाल्या असून त्या पावसाळ्यात पडण्याचा धोका आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. तसेच बहुतांश शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे इच्छा असतांना पालक आपल्या पाल्याला मनपाच्या शाळेत शिकविण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे शाळा सुरू होण्यापूर्वी महापालिका शाळांच्या इमारतींची दुरुस्ती करून विविध सुविधा पुरविण्यात याव्यात. व शैक्षणिक साहित्य पुरवून शिकण्यास योग्य असे वातावरण तयार करावे, अशी मागणी मनविसेतर्फे मनपा प्रशासनाकडे निवेदनाव्दारे करण्यात आली होती.

या आंदोलनाची दखल घेत मनपा उपायुक्तांनी शाळा दुरूस्तीबाबत आदेश काढले आहेत. त्यात म्हटले आहे की, प्रभाग क्र.14, 20, 21, 23, 25,26, 27, 28 या प्रभागातंर्गत येणार्‍या मनपाच्या शाळा दुरूस्ती करणे कामाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. मंजुरीअंती या शाळांची दुरूस्ती करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले आहे. याबद्दल मनविसेने आयुक्तांचे आभार मानले आहेत.

यावेळी दुष्यत देशमुख, प्रसाद देशमुख, गौरव गीते, यश शर्मा, नितीन शर्मा, राहूल मराठे, विजय जगताप, चेतन चौधरी, गुरुराज पाटील, निखिल वानखेडकर, रवी शिंदे, अभिजीत सोनवणे, स्वानंद बंड, गुरूराज पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*