Thursday, May 2, 2024
Homeधुळेतिघांकडून 19 चाकू, 13 फायटर जप्त

तिघांकडून 19 चाकू, 13 फायटर जप्त

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

शहरातील देवपूरातील श्री एकविरा देवी मंदिरासमोरील रस्त्यावर पोलिसांनी तीन जणांना हत्यारांसह पकडले.

- Advertisement -

त्यांच्याकडून दुचाकीसह 19 चाकु, 13 फायटर असा एकुण 29 हजारांचा मुद्येमाल जप्त केला. याप्रकरणी तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

देवपूर पोलिसांनी काल दि. 18 रोजी दुपारी श्री एकविरा देवी मंदिराजवळ समोरील रस्त्यावर दुचाकीने जाणार्‍या राहुल कृष्णा वानखेडे (वय 22 रा. भिमनगर, साक्री रोड, धुळे) व देवपूरातील एक अल्पवयीन मुलास पकडले. त्यांच्याकडून हत्यारे जप्त करण्यात आली.

तर मामलेदार कचेरी ते अकबर चौकाकडे जाणार्‍या एका कटलरी दुकानातील अबरार मोहंमद हुसेन तांबोळी (वय 25 रा.हजारखाली, धुळे) याच्यासह वरील दोघांकडून 19 चाकु, 13 बीडाचे फायटर व एक स्टीलचा धारदार पाते असलेला पेन, एक मोबाईल व दुचाकी असा एकुण 29 हजारांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोकाँ किरणकुमार साळवे यांच्या फिर्यादीवरून हत्यारे बेकाशीररित्या जवळ बाळगतांना मिळून आल्याने तिघांविरूध्द देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या