पिंपळनेर येथे विश्वशांती रथाचे स्वागत

0
पिंपळनेर । वार्ताहर- शांतीदूत प. पुज्य मंत्र शिरोमणी, राष्ट्रसंत विद्यासागर यतिवर्य डॉ. वसंत विजय महाराज यांचे मार्गदर्शनाने व प्रेरणेने जगातील सर्वात उंच 421 फुट उंच सर्वाच्च शिखर असलेल्या भव्य मंदिराच्या प्राण प्रतिष्ठाप्रसंगी तामिळनाडू येथील कृष्णगिरी येथे 3 ते 11 फेब्रुवारी 2019 दरम्यान विश्वशांती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

याबद्दल देशभरात विश्व शांती रथाची मिरवणूक सुरू असून आज सकाळी पिंपळनेर येथे रथाचे आगमन झाले. येथील सकल जैन व इतर समाजातर्फे रथाचे स्वागत करण्यात आले.

शहरातील गोपाल नगर, नाना चौक, बाजारपेठ, खोलगल्ली, विश्वनाथ चौक, मेनरोड, स्टॅन्ड चौफुली व सटाणा रोडमार्गे रथाची मिरवणूक काढण्यात आली. महावीर भवन येथे रथाची मिरवणूकीची सांगता झाली. त्यानंतर येथे प्रवचनाचा कार्यक्रम झाला. मिरवणूकीत महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

यावेळी माजी मंत्री डॉ विजयकुमार गावित, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर एखंडे, पिंपळनेर सरपंच राजेंद्र शिरसाठ, मुस्लिम समाजाचे अल्ताफ भाई, बोहरा समाजाचे हातिम भाई, मराठा समाजाचे सुरेंद्र मराठे, सोनी समाजाचे भालचंद्र दुवाणे तसेच पिंपळनेर संघाचे संघपती धनराज कोचर,

अध्यक्ष सुभाषचंद्र गोगड़, अशोक कोचर, जीवन खिवेसरा, रिखबचंद गोगड़, मदनलाल बुरड़, रिखबचंद टाटिया आदीं उपस्थित होते. तसेच चंदनबाला महिला मंडळ, तेरापंथ महिला मंडळाच्या शैला गोगड़, स्वाती गोगड़, शोभा कोचर, किरण रांका, मंगला कोचर, सरोज बाफना,मदनबाई वेदमूथा, पूजा कोचर, स्नेहा कोचर, रत्नाबाई बाफना आदी महिलाही उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

*