मेरा परिवार भाजप परिवार ना.डॉ.भामरेंच्या घरावर भाजपचा झेंडा

0
धुळे । मेरा परिवार भाजप परिवार उपक्रमाची सुरुवात आज दि.12 रोजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी स्वतः आपल्या घरावर भारतीय जनता पक्षाचा झेंडा लावून केली.

भारतीय जनता पक्षातर्फे आपल्या सक्रिय कार्यकर्त्यांसह पक्षसमर्थकांसाठी अभिनव असा मेरा परिवार भाजप परिवार उपक्रम राबवला आहे. या उपक्रमांतर्गत आपल्या घरावर भारतीय जनता पक्षाचा झेंडा लावून परिसरातील नागरिकांनाही भारतीय जनता पक्षाच्या कार्याची माहिती करुन दिली जाणार आहे.

शहरातील ऐंशी फुटी रोडवरील निवासस्थानी ना.डॉ.सुभाष भामरे यांनी पक्षाचा झेंडा निवासस्थानावर लावला. तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांनी आपल्या घरावर भाजपचा झेंडा लावून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी भाजप महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, महापौर चंद्रकांत सोनार, संघटक सरचिटणीस विजय पाच्छापुरकर, सरचिटणीस चंद्रकांत गुजराथी, गजेंद्र अंपळकर, माजी महापौर जयश्री अहिरराव, महिला जिल्हाध्यक्षा रत्ना बडगुजर, डॉ.माधुरी बोरसे, धुळे शहर विधानसभा विस्तारक यशवंत येवलेकर, डॉ.राहुल भामरे, नगरसेवक संजय पाटील, नगरसेवक सुनील बैसाणे, नगरसेवक शशी मोगालाईकर, आझादनगर मंडल अध्यक्ष अनिल थोरात, दिनेश बागुल, भिकन वराडे, सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष किरण देशमुख आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*