Type to search

maharashtra धुळे

स्वामीनारायण मंदिरात विश्वशांतीसाठी महायज्ञ

Share
धुळे । भारतासह जगात प्रेम, बंधुता, सामाजिक सहकार, मुल्यनिष्ठा, उपासना आणि सर्वत्र शांतता निर्माण व्हावी, आतंकवाद नाहीसा व्हावा यासाठी आज सकाळी महायज्ञ करण्यात आला. यासाठी तब्बल 2400 जोडप्यांनी पूजा केली. दरम्यान, उद्या दि. 10 फेब्रूवारी रोजी स्वामी नारायण मंदिरात मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम होणार आहे.

शहरातील देवपूरात असलेल्या स्वामीनारायण मंदिराच्या परिसरात गुलाबी दगडापासून नवीन भव्य मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे. या मंदिरात मूर्ती प्राण प्रतिष्ठेनिमित्त 8 फेब्रुवारीपासून सोहळ्यास सुरूवात झालेली आहे.
काल 48 चित्ररथांनी सजविलेल्या चित्ररथांनी भगवान स्वामिनारायणांच्या मूर्तीची शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत हजारो भाविक सहभागी झाले होते.

आज दि. 9 फेब्रुवारी रोजी विश्वशांतीसाठी महायज्ञ करण्यात आला. यासाठी 300 यज्ञकुंडी तयार करण्यात आली होती. एका यज्ञकुंडाच्या ठिकाणी आठ दाम्पत्य बसले होते. असे एकूण 2400 दाम्पत्यांनी यज्ञात सहभाग घेतला होता.

सुरवातीला महंत स्वामी महाराज यांचे एका वाहनातून यज्ञस्थळी आगमन झाले. मुख्य यज्ञकुंडात महंत स्वामी महाराजांनी आहुती टाकल्यानंतर यज्ञ सोहळ्यास सुरूवात झाली. वेद मंत्रोच्चाराच्या जयघोषात यज्ञात आहुती टाकण्यात येत होती. तसेच भाविक भक्तांच्या जीवनात आणि विश्वातील समस्त मानवाला शांती मिळावी, ते सुखी रहावे अशी प्रार्थना करण्यात आली.

सुमारे चार तास हा यज्ञ सोहळा सुरू होता. यावेळी महंत स्वामी महाराज यांनी आशिर्वाद देतांना म्हणाले, यज्ञ परंपरा भारताची प्राचीन, वैदीक परंपरा आहे.सर्व भौतिक आणि जैविक तत्वांच्या सहकाराची भावना यज्ञात अभिव्यक्त होत असते. भगवान स्वामीनारायणांची भावना सर्व जीवहितासाठी होती. असे त्यांनी सांगितले. यज्ञसोहळा सुरू असतांना शहरासह ग्रामीण भागातील हजारो भाविकांनी दर्शन घेतले होते. यावेळी साधुसंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंदिरात उद्या सकाळी 10 वाजेपासून वेद मंत्रोच्चाराच्या जयघोषात स्वामी नारायण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास सुरूवात होणार आहे. हा सोहळा सुमारे दोन तास सुरू राहिल. महंत स्वामी महाराज यांच्याहस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होइल. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान मंदिरात स्थापित करण्यात येत असलेली भगवान स्वामीनाायणांची मूर्ती पाच फुटाची आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!