ध्रुवी खताळ हिची राष्ट्रीय भरतनाट्यम स्पर्धेसाठी निवड

0

अकोले (प्रतिनिधी)- अहमदनगर स्पोर्ट्स डान्स संघटना व महाराष्ट्र स्पोर्ट्स डान्स संघटना यांच्या वतीने आयोजित चौथ्या राज्यस्तरीय डान्स स्पर्धेत अभिनव शिक्षण संस्थेच्या वसुंधरा अकॅडमी मधील पहिल्या इयत्तेतील कुमारी ध्रुवी अरुण खताळ हिने भरत नाट्यममध्ये सुवर्ण पदक पटकाविले. तिची गोवा येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

11 व 12 नोव्हेंबर ला ध्रुव अकॅडमी,संगमनेर येथे ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द गावची कन्या आणि अभिनव संचलित वसुंधरा अकॅडमी ची इयत्ता पहिली मधील विद्यर्थिनी ध्रुवी अरुण खताळ (वय- 7 वर्ष)हिने सब ज्युनियर वयोगटा मध्ये वेस्टर्न डान्स मध्ये सुवर्णपदक पटकावले.ध्रुवी ही येथील बालरोग तज्ञ डॉ.अरुण खताळ यांची कन्या आहे. यापूर्वीही तिने विविध स्पर्धांमध्ये बक्षिसांची लयलूट केलेली आहे.

ध्रुवी ला डान्स प्रशिक्षक म्हणून श्रीमती कुसुम इंगळे व अभिनव चे आदित्य टांकवाल यांनी मार्गदर्शन केले.
ध्रुवीचे अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव नवले ,प्राचार्य संजय बढे ,व डान्स प्रशिक्षक श्रीमती कुसुम इंगळे , सौ अनुराधा मालपाणी यांनी कौतुक केले राष्ट्रीय स्तरावरील डान्स स्पर्धा ही जानेवारी 2018 मध्ये गोव्याला होणार आहे .या स्पर्धेसाठी ध्रुवी हिची निवड झाली आहे.तिचे  कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

*