कोलकत्ता : जाहिरातीच्या शुटिंगसाठी कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी आले एकत्र

0

कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी यांना एकत्र खेळताना पाहण्याची संधी गुरुवारी ईडन्स गार्डन्सवरील उपस्थितांना मिळाली.

एका जाहिरातीच्या शुटिंगसाठी हे दोघे एकत्र आले होते. पण यावेळी कपिल देव यांनी टाकलेल्या एका बाऊन्सरने धोनीला आश्चर्यचकित केलं. मैदानातच जवळपास 30 सेकंदाच्या सीनचे शुटिंग करण्यात आले. याचं दिग्दर्शन बंगाली निर्माता आणि दिग्दर्शक अरिंदम सिल यांनी केलं.

शुटिंगच्या वेळी दोन्ही खेळाडूंनी संपुर्ण वेळ फक्त क्रिकेट खेळण्यात घालवला. यावेळी आधी कपिल देव यांनी महेंद्रसिंग धोनीसाठी गोलंदाजी केली.

यावेळी धोनी आणि कपिल देव यांनी खेळपट्टीची पाहणीही केली. भारत आणि श्रीलंकादरम्यान पहिला कसोटी सामना याच मैदानावर खेळला जाणार आहे. 16 नोव्हेंबरला पहिला सामना होणार आहे.

LEAVE A REPLY

*