Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सुरगाणा : घोडांबे (बोरगांव) धरणाला गळती

Share

सुरगाणा l वार्ताहर

सुरगाणा तालुक्यात मागील काही दिवसांपासून पावसााच्या संततधारेमुळे बोरगांव घाटमाथ्यावर असलेले लघु जलसिंचन प्रकल्पातील धरण जवळपास साठ टक्के भरले असून या धरणातील डाव्या कालव्याच्या बाजूने असलेल्या बांधातून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली आहे.

तसेच तळमोरीसुद्धा पूर्णपणे लिक झाली असून त्यातूनही मोठ्या प्रमाणात पाणी पाटात जात असून सर्व पाणी नदीमार्गाने वाया जात आहे.

सुरगाणा तालुक्यातील मोठे धरण व बोरगांव घाटमाथा परिसरातील शेतकरी तसेच व्यवसायाची संपूर्ण मदार या धरणावर असून कालव्यातून ज्या प्रकारे पाणी वाया जात आहे ते पाहिले तर पाऊस संपल्यावर पुढच्या काही दिवसातच संपूर्ण धरण आटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तसेच अती पाऊस झाल्यास या लिकेज झालेल्या भिंतीस भगदाड पडून जिवीतहानी व शेतीपिकांचे नुकसान सुद्धा होऊ शकते.

या धरणाचे बांधकाम सन १९९० च्या काळात पूर्ण झाले असून तेव्हापासून कोणत्याही प्रकारची दुरुस्ती संबंधित विभागाने केली नाही.

या सर्वांची लवकरात लवकर दखल घेऊन पाण्याची होणारी गळती थांबविण्यात यावी जेणेकरून होणारी जीवितहानी व वित्तहानी टळू शकेल अशी मागणी केली जात आहे.

आज सकाळीच धरणाच्या शेजारील शेतकऱ्यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली असून, डाव्या कालव्याच्या बाजूने भिंतीतून पाणी लिकेज होत आहे व तळमोरीतून सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी लिक होऊन वाया जात आहे, संबंधित विभागाने लवकरात लवकर या जागेची पाहणी करून पाण्याची गळती थांबवावी व भिंतीला भगदाड पडून भविष्यात होणारी जीवितहानी व वित्तहानी थांबवावी.

– सभापती, सुवर्णा गांगोडे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!