आजची सर्वात जबरी न्यूज; ढिंचॅक पूजाचे व्हिडिओ डिलिट

0

चीनशी युद्ध करण्यापेक्षा ढिंचॅक पूजाला सिक्कीम बॉर्डरवर पाठवा. तिच्या गाण्यामुळे चीन स्वत:हूनच माघार घेईल… अशा शब्दांत तिचा गाण्यांबद्दल नाराजी व्यक्त करणाऱ्या सोशल मीडिया मित्रांसाठी सर्वात आनंदाची बातमी.

ढिंचॅक पूजाचे युट्यूबवरील व्हिडिओ डिलीट केल्यानंतर  ‘अच्छे दिन आ गये ’ म्हणत सोशल मीडियावर लोकांनी सेलिब्रेशन सुरू केले आहे.

अनेकांनी ही आनंदाची बातमी मॅसेजेसद्वारे आपल्या मित्रांना सांगत सुटकेचा निश्वास टाकला आहे.

गाणे कसे नसावे किंवा किती बेसूर असावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे अलिकडे गाजत असलेली युट्यूब स्टार ढिन्चॅक पूजा.

तिच्या युट्यूब चॅनेलचे आतापर्यंत २ लाख फॉलोअर्स आहेत, तर ३ कोटींहून जास्त वेळा तिचे व्हिडिओ पाहण्यात आले आहे.

मात्र आता तिचे व्हिडिओ यूट्यूब वरून उडवून टाकण्यात आले आहे. कॉपीराईटचा प्रश्न निर्माण झाल्याने युटयूबने हे व्हिडिओ काढून टाकले.

सेल्फीसारख्या तिच्या सूर ताल नसलेल्या गाण्यांची चर्चा होती. सोशल मीडियावाले या गाण्यांना वैतागले होते.

सर्व व्हिडिओ उडवला असला तरी स्कूटर गाण्याचा व्हिडिओ दिसतच आहे. त्याची लिंक वरती दिली आहे.

LEAVE A REPLY

*