नांदगाव तालुक्यातील ढेकू खुर्द गावात शेतकऱ्याची आत्महत्या

0

बोलठान ढेकु खुर्द येथील शेतकरी शिवजी गंगाधर सूर्यवंशी यांनी आज कर्जाला कंटाळून दुपारी 1:30 वाजता विषारी औषध सेवन करुण आपली जीवनयात्रा संपवली.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवाजी सूर्यवंशी हे मुळ ढेकु येथील रहिवशी असून त्यांना अडीच एकर जमीन आहे.

त्यांच्यावर बैंक ऑफ इंडिया  शाखा बोलठानचे 3 लाख 15 हजार तर विविध कार्यकारी सोसायटी जातेगावचेही कर्ज होते.

मागील 2 वर्षा पासून दुष्काळी परिस्थितीमुळे कर्जात वाढ होत होती. यातून आलेल्या कर्जबाजारीपणामुळे त्यांनी कपाशी फवारणीवरील औषध सेवन करून जीवनयात्रा संपवली.

त्यांच्या पश्यात आई पत्नी 2 मुले सुना नातवंडे असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

*