Type to search

आवर्जून वाचाच जळगाव फिचर्स

धरणगाव : गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे यांचा मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प

Share

 

धरणगाव ( प्रतिनिधी)

तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला आहे.

वाढदिवशी मरणाची कल्पना खरं तर अनेकांना चमत्कारिक वाटू शकते. मात्र, बिऱ्हाडे यांनी प्रबोधनाची कास धरत एक अभिनव संकल्प केला आहे.

विधायक कार्याचा उपदेश किंवा भाषणातून पुरस्कार करण्याऐवजी ते त्यांनी स्वतः कृतीतून समोर ठेवले आहे.

कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी म्हणून ख्याती असलेले समाजाप्रती जाण असलेले उत्तम मार्गदर्शक अशोक बि-हाडे तालुक्यात सुपरिचित आहेत.

६ डिसेंबर रोजी त्यांचा वाढदिवस आहे, वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला असून एक नवा आदर्श घालून दिला आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!