Type to search

Featured जळगाव नंदुरबार विधानसभा निवडणूक २०१९

धानोरा: वेळ संपूनही मतदान सुरूच; सकाळी यंत्रात झाला होता बिघाड

Share

धानोरा, ता. चोपडा (वार्ताहर) –

मतदारांच्या रांगा लागलेल्या असून मतदान रात्री आठ वाजेपर्यंत मतदान चालण्याची शक्यता आहे. या ठिकाणी 181, 182, 183, 184, 185 असे पाच मतदान केंद्र असुन एकुन 57100 असे मतदार संख्या आहे. मात्र मतदार उशीरा मतदानासाठी आपला हक्क बजावण्यासाठी आले. त्यामुळे सहा वाजेची वेळ संपुनही येथे पाचही बुथवर मतदारांनी मोठी गर्दी केली होती.

त्यामुळे सेक्टर अधिकारी आर.आर.चौधरी यांनी मतदान केंद्राचे मुख्य गेट बंद केले व प्रत्येकाला नंबर पावतीचे वाटप केले. यावेळी अडावद पोलीस स्टेशनचे स. पो. निरिक्षक योगेश तांदळे यांनीही आपल्या कर्मचारीं मार्फत गर्दी हटवून शांतता ठेवली. मात्र अंधाऱ्यात शेकडो मतदारांनी रांगा लावल्या असुन हे मतदान पुर्ण होण्यास तब्बाल आठ वाजण्याची शक्यता आहे.

सकाळी मतदान केद्रात झाला होता बिघाड

सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर अवघे चार मतदान झाल्यावर बुथ क्र.183 येथील मतदार यंत्रात बिघाड झाला होता. त्यामुळे अनेक मतदार माघारी फिरले होते व तब्बल दिड तांसांनी दुसरे यंत्र लावुन येथे मतदान सुरू झाले होते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!