Type to search

Featured सार्वमत

धनगर आरक्षण अहवाल सरकारकडे सादर जनतेसमोर त्वरित मांडावा : पिचड

Share
अकोले (प्रतिनिधी)- भाजपा सरकारने धनगरांचा आदिवासींमध्ये समावेश करण्याच्या मागणीच्या अनुषंगाने टाटा संशोधन संस्थेला याबाबत अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी सांगितले होते. त्याप्रमाणे टाटाने हा अहवाल 31 ऑगस्ट 2018 रोजी राज्य सरकारला सादर केला. हा अहवाल भाजप सरकारने जनतेसमोर जाहीरपणे ताबडतोब मांडावा असे आवाहन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी केले.

श्री. पिचड यांनी याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, धनगर समाजाने आपला आदिवासींमध्ये समावेश करावा ही मागणी केली. यानंतर भाजपा सरकारने राजकीय दबावापोटी टाटा संशोधन संस्थेला यादृष्टीने अभ्यास करण्यास सांगितले. वास्तविक पाहता हे काम आदिवासी संशोधन समिती पुणेला देणे गरजेचे गरजेचे होते, पण तसे झाले नाही. पुढे भाजपा सरकारने चार वर्षे राजकारण केले. जाणीवपूर्वक हे काम टाटा संशोधन संस्थेला दिले. गरीब व दीन दुबळ्या आदिवासी समाजाला अंधारात ठेऊन त्यांच्या ताटातले काढून खोट्या आदिवासींच्या पुढे ताट वाढण्याचे सबलांचे हे कृत्य घृणास्पदच नाही तर आदिवासी समाजावर पुढे अनेक वर्ष घोर अन्याय करणारे ठरणार आहे. भाजप सरकारने चार वर्ष या विषयावर जनतेला झुलवत ठेवले. वास्तविक पाहता धनगर आदिवासी आहेत का नाही हा अभ्यास करण्याचे काम स्वायत्त असणार्‍या आदिवासी संशोधन समितीला देणे गरजेचे होते. परंतु तसे भाजप सरकारने केले नाही. टाटा संशोधन संस्थेने हा अहवाल 31 ऑगस्ट 2018 रोजी राज्य सरकारला सादर केला. त्यानंतर सरकारने हा अहवाल काय आहे. हे जनतेसमोर मांडणे आवश्यक असताना हा अहवाल लपून ठेवला. या अहवालात काय आहे? हे पुढे येणे गरजेचे असून तो सरकारने ताबडतोब 24 तासाच्या आत जाहीर करावा.

धनगर खरे आदिवासी आहेत का नाही याबद्दल अहवालात काय म्हटले आहे. तेही स्पष्ट होईल. पण सरकारने हा अहवाल का लपून ठेवला? हे समजत नाही. हा अहवाल सर्वसामान्य माणसाला कळला पाहिजे. याबाबत आपण राज्याचे आदिवासी विकास मंत्री, सचिव यांच्याशी देखील या अहवालाबाबत बोललो, पण ते ही याबाबत बोलायला तयार नाही. धनगर समाजाने आंदोलन तिव्र केल्यामुळेच सरकार जागे झाले असले तरी सरकारने हा अहवाल जनतेसमोर मांडावा असेही श्री. पिचड यांनी म्हटले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!