Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

धनगर समाजाला कुक्कट पालनासाठी 75 टक्के अनुदान

Share

नगर जिल्ह्यात 1 हजार लाभार्थी निवडणार

अहमदनगर (प्रतिनिधी)- बंदिस्त शेळी मेंढी पालनाबरोबरच आता भटक्या जमाती (क) प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजातील तरुणांना 75 टक्के अनुदान देण्याची योजना राबविण्यात येत आहे. याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

मनपा, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत व कटक मंडळे वगळून ही योजना राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात या समाजाच्या 1 हजार लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. 34 जिल्ह्यांत एकूण 34 हजार लाभार्थी निवडण्यात येणार आहे. निवड झालेल्या प्रत्येक लाभार्थ्यास चार आठवडे वयाच्या सुधारित देशी प्रजातीच्या 4 आठवडे वयाच्या 100 मिश्र कुक्कट पक्ष्यांचा पुरवठा करण्यात येईल. धनगर समाजातील 18 ते 60 वयोगटातील व्यक्ती पात्र असेल. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ मिळेल. या व्यवसायासाठी पुरेशी जागा असावी. 30 टक्के महिला व 3 टक्के दिव्यांग लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

योजना राबविण्यासाठी कार्यपध्दती ठरविण्यात आली आहे. या योजनेसाठी जिल्ह्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्ततांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती गठीत करण्यात येणार आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!