नाशिकच्या धनश्रीला राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत ‘सुवर्ण’

0
नाशिक :  तेलंगणा राज्यातील वारंगल येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील आणि दिंडोरी तालुक्यातील जानोरी आंबे येथील धनश्री अनिल राठी हिने एलो गुणांकन 1730 मिळवत 19 वर्षाखालील मुलींच्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली तर सांघिक स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली.

स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित अखिल भारतीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे 9 ते 14 नोव्हेंबरदरम्यान आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत धनश्रीने शेवटपर्यन्त अजिंक्य राहून 6 सामन्यात 5.5 गुण मिळविले. त्यात 5 विजय व एक सामना तिने बरोबरीत सोडवला.

तिने तमिळनाडूच्या महिला फिडे मास्टर ए हर्षिणी चा पराभव केला. यातून धनश्रीने आपल्या बुद्धीमतेची चुणूक दाखवून देत महाराष्ट्र संघाला कास्यपदक मिळवून दिले. या स्पर्धेत भारतातील 26 राज्य व केंद्रशासित प्रदेशातील तुल्यबळ 130 खेळांडूंनी भाग घेतला होता.

नाशिकचे सुवर्णपदक विजेते राष्ट्रीय खेळाडू व नामवंत प्रशिक्षक विनोद भागवत, सुनील शर्मा, मंगेश गंभीरे यांचे तिला मार्गदर्शन लाभले. बोटविनिक स्कूलतर्फे सुरू असलेल्या विविध बुद्धिबळ उपक्रमांमुळे धनश्रीला मोठ्या प्रमाणात फायदा झाला असल्याचे ती सांगते.

धनश्रीला प्रोत्साहन मिळाल्यास नाशिकला महिला ग्रँडमास्टर मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. धनश्रीने ग्रामीण भागातून येवून मिळविलेले हे यश सर्व जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रासाठी प्रेरणादायी असून आर्थिक आधार मिळाल्यास ती आंतरराष्ट्रीय महिला ग्रँडमास्टर किवा आंतरराष्ट्रीय महिला मास्टर किताब मिळवू शकते असा विश्वास ज्येष्ठ प्रशिक्षक विनोद भागवत यांनी व्यक्त केला.

धनश्रीच्या विजयाने दिंडोरी तालुक्यात जल्लोष करण्यात आला. तिच्या यशाबद्दले खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार जयंत जाधव, नरहरी झिरवाळ, जिल्हा क्रीडा अधिकारी नाईक, जिल्हा आरोग्य अधिकारी सुशील वाकचौरे, प्रथितयश सनदी लेखापाल व बुद्धिबळपट्टू विनय बेळे, आर वाय के महाविद्यालयाचे प्राचार्य सूर्यवंशी, उगले, क्रीडा शिक्षक कोकाटे यां यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

*