Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

धामनगाव : ‘एसएमबीटी’तील विद्यार्थी करणार कॅन्सर व एड्सवर संशोधन; थायलंडला अभ्यास दौरा

Share

लक्ष्मण सोनवणे | बेलगाव कुऱ्हे

निसर्ग हा सर्वशक्तिमान व सर्वसमावेशक आहे. त्यावर विश्वास ठेवून सकारात्मक विचारसरणी असली की असाध्य गोष्टीही साध्य करता येतात. निसर्गातील औषधी वनस्पतींचा गुणधर्म अभ्यासुन त्याचा उपयोग अनेक आजार दूर करण्यासाठीही केला जाऊ शकतो या शास्रीय दृष्टीकोनातून इगतपुरी तालुक्यातील धामनगाव येथील एस.एम.बी.टी इंस्टिट्यूट ऑफ डी फॉर्मसी मधील विद्यार्थ्यांची कॅन्सर व एड्स सारख्या रोगांसाठी प्राकृतिक औषधी वनस्पतीवर संशोधन करण्यासाठी थायलंडला निवड झाली आहे. येत्या 4 जून ला थायलंडला हे विद्यार्थी त्यांच्या प्राचार्यांसह रवाना होणार आहेत.

संशोधनासाठी एसएमबीटी इन्स्टिट्युट ऑफ डी फार्मसीचा प्रिन्स ऑफ सोकला युनिव्हर्सिटी हतयाई, थायलंड सोबत मागच्या वर्षी करार झाला होता. त्या अनुषंगाने प्राचार्य योगेश उशीर गेल्या एक वर्षांपासून कॅन्सर व एड्स या रोगांसाठी प्राकृतिक औषधी वनस्पतीवर संशोधन करीत आहेत.

या अभ्यास दौऱ्यात डीनए, फिंगर प्रिंटिंग वनस्पती हाताळण्याचा आधुनिक प्रकार शिकविले जातात. थायलंड येथील प्रिन्स ऑफ सोकला युनिव्हर्सिटीमध्ये प्रा. चाटचाई.  प्रा. सुकन्या, प्रा. जिदापोर्न , डॉ. उशीर यांच्या मार्गदर्शनाखाली गोपाली, गोजीभा, चंदर या नैसर्गिक औषधी वनस्पतींवर संशोधन करणार आहेत.

आतापर्यंत झालेल्या संशोधनातील निकषानुसार कॅन्सर व एड्स या आजारांवर प्राकृतिक औषध बाजारात लवकरच उपलबध होणार असल्याचे डॉ. योगेश उशीर यांनी देशदूतशी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

प्राचार्य योगेश उशीर, किरण सूर्यवंशी यांनी आपले कौशल्य, क्षमता व प्रतिभा पणाला लावत आपल्या नियुक्त क्षेत्रात अभिनव व देदीप्यमान कामगिरी करताना त्यांचे सहकारी कुंदन तिवारी आणि विध्यार्थी ह्यांचीही मोलाची साथ लाभली त्यामुळे हाती घेतलेल्या कामात यश मिळाले.

प्राचार्य उशीर , सूर्यवंशी औषधनिर्माण क्षेत्रात अनेक वर्षांपासून संशोधन करत आहेत. आता पर्यंत प्राचार्य योगेश उशीर यांनी आरोग्यवर्धक जायफळापासून एका विशेष संशोधनातून वेदनाशामक औषधाची निर्मिती, उंबराच्या पानातून प्रभावी औषध निर्मीत केले असून ५ पुस्तके, ३३ पेक्षा जास्त शोधनिबंध प्रसारीत केले आहेत. तसेच २०१४ ते २०१८ मध्ये मलेशिया, सिंगापूर येथे झालेल्या जागतिक परिषदेतही सहभाग घेतला आहे.

कॅन्सर व एड्स आजारांपासून मुक्तता मिळावी या जनकल्याणासाठी केलेले हे बेजोड संशोधन आणि समाजउपयुक्त ठरणारे औषध तयार करुन आपली असामान्य बुध्दीमत्ता सिध्द करणाऱ्या प्राचार्य उशीर आणि सहकारी यांना सर्वतोपरी पाठिंबा देत येथील आमदार डॉ.सुधीर तांबे, ट्रस्ट मुख्य कार्यकारी विश्वस्त डॉ. हर्षल तांबे, श्रीराम कुऱ्हे , दशरथ वर्पे, ब्रिगेडियर वसंत पवार, डॉ.ढाके, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष मिलिंद कुकडे यांनी अभिनंदन करीत थायलंडमध्ये अभ्यास दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या.

औषधनिर्माणशास्रज्ञ म्हणून सर्वसामान्यांच्या आरोग्याचा विचार करणे ही मी माझी नैतिक जबाबदारी मानतो. येत्या काळात भयानक आजारांपासून रुग्णांना वाचविण्यासाठी सोईस्कर तसेच अधिक गुणकारी औषधे कशी बनवता येतील यावर पुढील संशोधनात आमचा भर असेल जेणेकरून सर्व थरांतील रुग्णांना मदत व्हावी.

डॉ.योगेश उशीर, प्राचार्य

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!