‘धडक’च्या शूटिंगला सुरुवात

0

मराठीतील ब्लॉकबस्टर ठरलेल्या सैराट या चित्रपटाचा हिंदी रिमेक करण जोहर घेऊन येत असल्याचे आता आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे.

‘धडक’हे या चित्रपटाचे शीर्षक आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पोस्टर्स रिव्हील करण्यात आले होते. या चित्रपटातून ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या चित्रपटाच्या चित्रीकरणाला आता सुरुवात झाली असून चित्रीकरणाच्या पहिल्या दिवसाचे काही फोटोज समोर आले आहेत. सेटवर पूजा करुन चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली आहे. ईशान आणि जान्हवी यांचेही दोन फोटोज समोर आले आहेत.

शशांक खेतान हा चित्रपट दिग्दर्शित करत असून करण जोहर याचा निर्माता आहे.

6 जुलै 2018 ही ‘धडक’ची रिलीज डेट निश्चित करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*