Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

जम्मू येथील वैष्णोदेवी मंदिर परिसरात भक्तनिवासास जागा द्यावी

Share

श्रीरामपूर येथील भक्तांची पंतप्रधान कार्यालयाच्या सचिवांकडे मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी) – जम्मू-काश्मीरमध्ये 370 कलम रद्द झाल्याने महाराष्ट्रातील भाविकांसाठी वैष्णोदेवी मंदिर परिसरात भक्तनिवास उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी श्रीरामपूर येथील जय मातादी मित्र मंडळाच्यावतीने पंतप्रधान कार्यालयाचे कॅबिनेट मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांचे सचिव संजीव शर्मा, तसेच जम्मू-काश्मीरचे माजी कॅबिनेट मंत्री श्यामलाल चौधरी यांच्या कडे केली आहे. या मागणीस दोघांनी सकारात्मक प्रतिसाद देत 370 कलम रद्द झाल्याने जागा देण्यास अडचण नाही, लवकरच सरकर निर्णय घेईल असे आश्वासन दिले.

श्रीरामपूर येथील जय मातादी मित्र मंडळाच्यावतीने 9 वर्षापासून जम्मू येथील वैष्णोदेवीच्या दर्शनास हजारो भाविकांना घेऊन जातात. नुकतेच श्रीरामपूर मधून शेकडो भाविक वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेले आहेत. मात्र, भाविकांना याठिकाणी राहण्यासाठी व थंडीपासून बचावाच्यादृष्टीने सुविधा मिळाव्यात यासाठी भक्त निवासासाठीच्या जागेसाठी अनेक वर्षापासून मागणी आहे.

भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांच्याशी संपर्क साधून श्रीरामपूरचे उपनगराध्यक्ष रवींद्र गुलाटी, नगरसेवक राजेश अलग, अनिल गुप्ता, हिंद सेवा मंडळाचे सचिव संजय जोशी,कंट्रोड महाराज, राज्य केमिस्ट असोसिएशनचे अजित पारख अशोक कारखान्याचे संचालक बबन मुठे, यश गुलाटी यांच्या शिष्टमंडळाने सर्व भक्तांसह संजीव शर्मा व श्यामलाल चौधरी यांची भेट घेऊन जागा मागणीचे निवेदन दिले. तसेच जम्मू-काश्मीरचे पूर्व मंत्री शक्तीराज परिहार, दूरसंचार मंत्रालय राजा कुलदीप सिंग, भूमी अभिलेख संचालक राजेश शावण, कटरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष शशी गुप्ता, श्यामलाल शर्मा, विजयकुमार यांच्या जम्मू येथे कार्यालयात भेटी घेतल्या व भक्त निवासासाठीच्या जागेची मागणी केली.

या मागणीनंतर कटरा येथे अयोजित माता की चौकी या कार्यक्रमानिमित्त दूरसंचार मंत्रालयांचे सदस्य श्रीराजा कुलदीप सिंग व कटराचे नगराध्यक्ष शशी गुप्ता यांनी जम्मू काश्मीर येथे 370 कलम उठल्याने केंद्र शासन देशभरातील राज्यांमधील नागरिकांसाठी तसेच भक्तांसाठी सुख सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणार आहेत असे सांगून जागेच्या मागणी संदर्भात निश्चितच विचार करून महाराष्ट्रभक्त निवासासाठी लवकरात लवकर जागा मिळवून देण्याचे आश्वासित केले.

यावेळी प्रशांत अलग, धीरज गुजर, बंटी थापर, अमन अलग, चेतन जगी, बॉबी सहानी, अनिल छाबडा, गोलू दुगल, बंटी नागपाल, सौरभ पंजाबी, कार्तिक जाधव, भरत कुमार, विषाल गुप्ता, विजय पंजाबी, लकी गुप्ता, सुशील शिरसाठ, मनोज गागरे, गणेश वर्मा, मोती मिलानी, सुशिल गांधी यांच्यासह भावी उपस्थित होते.
……………
अंध विद्यार्थ्यांचे हेलिकॉप्टरव्दारे वैष्णोदेवीचे दर्शन
श्रीरामपूर येथील नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड या अंध शाळेच्या विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांना जय मातादी मित्र मंडळाच्यावतीने वैष्णोदेवी येथे सोबत घेऊन जाऊन कटरा ते गडावरील वैष्णोदेवीचे हेलिकॉप्टरद्वारे दर्शन घडवून आणले. दर्शन झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!