Photo Gallery : दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा; विविध धार्मिक कार्यक्रमांनी जिल्ह्यात दत्तजयंती साजरी

0
नाशिकरोड । आज दत्तजयंतीनिमित्त नाशिक शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

नाशिक गंगाघाट, मालेगाव, सिन्नर, देवळा, देवळालीगाव, विहितगाव, अण्णा गुरूजी गणपती मंदिर, दत्तमंदिर चौक, जगताप मळा, जेलरोड, मुक्तिधाम आदी भागातील मंदिरात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

देवळाली गावातील आठवडे बाजार परिसरातील मंदिरात काल्याचे किर्तन, मिरवणूक, महाप्रसाद वाटप करण्यात आले. दत्तमंदिर चौकातील पुरातन मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

सायंकाळी अनघा जोशी यांच्या भक्तिगीतांचे सादरीकरण झाले. अण्णा गुरूजी गणपती मंदिरात महाभिषेक, भजन, पुजा, जन्मसोहळा आदी धार्मिक कार्यक्रम झाले.

तसेच मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. बिटको कॉलेजच्या मागे असलेल्या एकमुखी दत्तमंदिरात जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी दत्तपारायण, महाप्रसाद आदी कार्यक्रम झाले. जेलरोड येथील गोदावरी सोसायटीतील दत्तमंदिरात सायंकाळी भजन व महाप्रसाद वाटप करण्यात आले. प्रसिद्ध मुक्तिधाम येथे भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

गंगाघाटावर एकमुखी दत्तमंदिरात गेल्या काही दिवसांपासून सप्ताह आयोजित करण्यात आला होता. हजारो भाविकांनी याठिकाणी नतमस्तक होत दर्शन घेतले.

 

 

LEAVE A REPLY

*