देवगडच्या आषाढी वारी दिंडीचे 17 जूनला प्रस्थान

0
देवगड फाटा (वार्ताहर) – संपूर्ण महाराष्ट्रात शिस्तप्रिय म्हणून ख्याती असलेल्या श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा आषाढी वारी पायी पालखी सोहळ्याचे श्रीक्षेत्र देवगड येथून 17 जून रोजी प्रस्थान होणार आहे. दिंडीचे हे 43 वे वर्ष आहे.
17 जून रोजी सकाळी 9 वाजता दिंडीचे श्रीक्षेत्र देवगड येथून प्रस्थान होईल. तेथून पुढे बकुपिंपळगाव येथे दिंडीचे स्वागत होईल. काही वेळ दिंडी येथे थांबेल. सकाळी 11.30 वाजता देवगड फाटा येथे सर्वधर्मिय व परिसरातील ग्रामस्थांच्यावतीने दिंडीचे स्वागत होईल.
17 जून रोजी दिंडीचा खडका येथे मुक्काम होईल. 18 रोजी काकडे मळा येथे सकाळी दिंडी थांबेल. दुपारी नेवासा येथे दिंडीचे भव्य स्वागत होईल. ज्ञानेश्‍वर मंदिर येथे या दिवशी दिंडीचा मुक्काम राहिल. 19 रोजी हंडीनिमगाव येथे दिंडी काही वेळ थांबून उस्थळ दुमाला येथे मुक्काम राहिल.
20 रोजी घोडेगाव येथे मुक्काम, 21 रोजी जेऊर बायजाबाई येथे मुक्काम, 22 रोजी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, नगर येथे मुक्काम राहील. 23 रोजी साकत खुर्द, 24 रोजी घोगरगाव, 25 रोजी मिरजगाव, 26 रोजी चापडगाव, 27 रोजी करमाळा, 28 रोजी जेऊर स्टेशन, 29 रोजी टेंभुर्णी, 30 रोजी करकंब, 1 जुलै रोजी अज्योती येथे मुक्काम करून 2 जुलै रोजी दिंडी पंढरपुरात पोहचणार आहे.
पंढरपूर येथे श्रीदत्त मंदिर संस्थानच्या दत्त मंदीर मठात दिंडीचा निवास राहिल. 5 जुलै रोजी सकाळी 8 ते 9 मठामध्ये काल्याचे कीर्तनानंतर प्रसाद घेऊन श्रींचा निरोप घेतला जाईल. 9 जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या वार्षिक कार्यक्रमासाठी श्रीक्षेत्र देवगड येथे सकाळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत भास्करगिरी महाराज यांचे कीर्तन होईल.
पालखी सोहळ्यात पहाटे 3 वाजता घंटानाद, सनई, साडेतीन ते साडेचार सर्व वारकर्‍यांच्या आंघोळी, साडेचार ते सहा काकडा भजन, सकाळी 6 ते साडेसहा चहापान, साडेसहा ते सात श्रींची सामुदायिक प्रार्थना, 7 वाजता पालखी सोहळ्याचे प्रस्थान, सकाळी 9 ते 9.30 विसावा, अल्पोहार, 10 ते 11 नगर प्रवेश, 11 ते 1 प्रवचन व दुपारचे भोजन, दुपारी 1 ते 3 विसावा, 3 ते 5.30 अभंग, गवळणी, हरिपाठ, नामजप, 7 ते 8.30 सायंभोजन, रात्री 9 ते 10 कीर्तन व 10 ते 3 पूर्ण विश्रांती असा कार्यक्रम राहील.

 भास्करगिरी महाराज दरवर्षीप्रमाणे दिंडीत पायी चालणार आहेत. दिंडी प्रस्थान ते पोहचेपर्यंत वारकर्‍यांच्या सेवेसाठी  संस्थानने पाणी टँकर, रुग्णवाहिका, जेवणाची जबाबदारी, डॉक्टर, सेवेकरी दिंडीसोबत असणार आहेत.

LEAVE A REPLY

*