देवगड दिंडीचे तोफांच्या सलामीने स्वागत ; नेवाशात रंगला रिंगण सोहळा

0
नेवासा (तालुका प्रतिनिधी) – संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या नेवासेनगरीत शिस्तबद्ध म्हणून महाराष्ट्रात ख्याती असलेल्या श्रीक्षेत्र देवगडच्या दिंडीचे तोफांच्या सलामीने स्वागत करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे बसस्थानकासमोर हजारो नागरिकांनी गोल रिंगण सोहळा अनुभवण्याचा आनंद घेतला.
श्री क्षेत्र देवगड येथील श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांच्या आषाढी वारी पायीदिंडीचे 47 वे वर्ष आहे. दिंडीचे दुपारी 2 वाजता शहरात आगमन झाले. बसस्थानक प्रांगणात ज्ञानोबा-तुकाराम च्या गजरात वारकर्‍यांनी रिंगण सादर केले. दुपारी नळकांडे मळा येथे दिंडीला नळकांडे कुटूंबियांच्या वतीने भोजन देण्यात आले. बसस्थानक प्रागंणात रांगोळया घालून परिसर सुशोभित करून तोफांच्या सलामी देत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. नेवासा आगाराचे अधिकारी व कर्मचार्‍यांसह नागरिकांनी दिंडीचे स्वागत केले.
यावेळी पंचायत समिती सभापती सौ.सुनिता गडाख यांच्या हस्ते रथातील श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांच्या प्राकृत पादूकांची पूजा करण्यात आली. आमदार बाळासाहेब मुरकुटे, तहसीलदार ज्योतीप्रकाश जायकर, भावी नगराध्यक्षा सौ. संगीता बर्डे, एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक उदय पाटील, यंत्र अभियंता मुकुंद कुवर, नेवासा आगार प्रमुख सुरेश देवकर व सौ. संगीता देवकर यांच्या हस्ते श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांच्या प्राकृत पादूकांची पूजा व महाआरती उपस्थित हजारो भाविकांच्या उपस्थितीत करण्यात आली.
रिगण सोहळ्यात देवगड दिंडीतील वारकर्‍यांनी रिंगण सादर केले. त्यानंतर एसटी कर्मचार्‍यांचे रिंगण, अश्‍व रिंगण, झेंडेकरी, टाळकर्‍यांचे रिंगणही यावेळी पार पडले. छत्रपती शिवरायांच्या वेषभूषा धारण केलेल्या गंगापूर तालुक्यातील आंबेगाव येथील सारंगधर पानकड़े यांनी भास्करगिरी महाराजांना मानवंदना दिली. यावेळी झालेले अश्‍वनृत्य सर्वांचे आकर्षण ठरले. बदामबाई हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी माऊली-माऊली गीतावर वारकरी वेशभुषेत नृत्य सादर केले.
यावेळी भास्करगिरी महाराज म्हणाले, पावसाने हजेरी लावली आहे. ओढे-नाले भरभरून वाहत आहेत. बळीराजा सुखी होऊ दे, माणसा-माणसातील वैरभाव नष्ट होऊ दे, मानवता धर्म देशात नांदू दे, राज्यात व देशात भरपूर पाऊस पडू दे असे साकडे त्यांनी पांडुरंगाला घातले.
नेवासा बसस्थानकावर कायमस्वरूपी पाणपोई उपक्रम राबविणारे विनोद कराडे, सतीश पवार यांचा व वारकर्‍यांना जार पाण्याची व्यवस्था केल्याबद्दल रहेमान पिंजारी, गणेश कोरेकर, संदीप वीर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. उपस्थित वारकर्‍यांना दूध उत्पादक संघटना व बब्बू बागवान यांच्या वतीने चहाचे मोफत वाटप करण्यात आले.पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर आगारप्रमुख सुरेश देवकर यांनी आभार मानले.
यावेळी नगरसेवक दिनेश व्यवहारे, रणजीत सोनवणे, संजय सुखधान, डॉ.सचिन सांगळे, भारत डोकडे, राजेंद्र मापारी, मुळाचे संचालक बाळासाहेब पाटील, कामगार नेते शफीक शेख, दिलीपराव दहातोंडे, भाऊसाहेब आव्हाड, देविदास गायकवाड, रमेश भारस्कर, ज्ञानदेव आगळे, रमेश दाणे, एस. एल. जामकर, एकनाथ पिटेकर, मुकेश गोहेर, बबनराव वरघुडे, नितीन जगताप, विशाल सुरडे, सुनील जाधव, जालिंधर गवळी, सौ.मृणालिनी मुळे, किशोर जोजार, रवी शेरकर, बाळासाहेब सोनवणे श्रीरामपूरच्या नगरसेविका चंद्रकला डोळस आदी उपस्थित होते.
संभाजी चौकात मुथ्था परिवारा च्या वतीने वारकर्‍यांना नाष्टा पाकिटाचे वाटप करण्यात आले. औदुंबर चौकात वाहन चालक-मालक संघटना तसेच पोलीस ठाण्याच्यावतीने निरीक्षक संपतराव शिंदे यांनी दिंडीचे स्वागत केले.

LEAVE A REPLY

*