माऊली – तुकारामाच्या जय घोषात देवगडच्या दिंडीचे प्रस्थान

0

देवगड फाटा (वार्ताहर) – राज्यात शिस्तबध्द म्हणून प्रसिध्द असलेल्या नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांच्या आषाढी वारी पायी पालखी दिंडीचे आज देवगड येथून पंढरपूरकडे प्रस्थान केले. ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या जयघोषाने देेवगड परिसर दणाणून गेला होता.

देवगड देवस्थानतचे मठाधिपती भास्करगिरी महाराजांच्या हस्ते भगवान दत्तात्रयासह श्री समर्थ किसनगिरी महाराज यांच्या समाधीचे व दिंडीत असलेल्या पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले. या दिंडीचे हे 43 वे वर्ष आहे. सजविलेल्या पालखीमध्ये श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबा यांच्या चांदीच्या प्राकृत पादुका दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. या पादुकांचे पूजन गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या उपस्थितीत खासदार चंद्रकांत खैरे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार शंकरराव गडाख, माजी आमदार पांडुरंग अभंग, काशीनाथ नवले, आदिनाथ महाराज भोगे, डॉ.वेणूनाथ वेताळ, अतुल महाराज आदमाने, बाळू महाराज कानडे, संत सेवेकरी बदामराव पठाडे, सीताराम जाधव, गोविंदराव शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.
देवगड दिंडीच्या स्वागतासाठी गुरुदत्त माध्यमिक विद्यालयाचे झांज पथक,लेझिम पथक सर्वांचे आकर्षण ठरले होते.तोफांच्या सलामीने अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त…दत्तात्रय भगवान की जय, ज्ञानोबा माऊली तुकाराम श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबा की जय या जयघोषाने देवगड परिसर दुमदुमला होता.
मुरमे येथे भास्करगिरी महाराज यांच्या मातोश्री सरुआई पिसोडे, ह भ प वेताळ महाराज, पोलीस निरीक्षक संपत शिंदे, ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे काकासाहेब शिंदे, सोमनाथ साखरे ,सहाय्य पो नि रफिक शेख, बजरंग विधाते, सुभाष धुत, निवृत्ती सुडके,बाळू माहाराज कानडे, जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब शेळके, बाळासाहेब पाटील, कैलास झगरे, शरद काटकर, चांगदेव अण्णा साबळे ,सुनील नाळके, विजय गुंदेजा,रामदास नवसे,अंबादास फोलने, कचरू भागवत, किरण धुमाळ, ग्रामसेवक विलास शेळके, संतोष साबळे यांच्यासह मुरमे ग्रामस्थांनी दिंडीचे स्वागत केले. दुपारच्या सत्रात बकुपिंपळगावमध्ये आगमन झाल्यानंतर दिंडीतील वारकर्‍यांचे स्वागत करून भोजन देण्यात आले. देवगडफाटा येथे जळके खुर्द बुदुक ग्रामस्थांच्या व परिसराच्या वतीने दिंडीचे फटाक्यांच्या आतषबाजी करत स्वागत करण्यात आले.
या दिंडीत 1400 महिला व पुरुष वारकरी सहभागी झाले आहे. दिंडीतील वारकर्‍यांचे साहित्य ठेवण्यासाठी 6 ट्रक, 7 ट्रॅक्टर ,1 रुग्णवाहिका व पिण्याचे पाणी टँकर आहेत.
देशात सर्व जाती धर्मात सलोखा रहावा शेतकर्‍यांना चांगले दिवस यावे चांगला पाऊस पडावा राजकीय नेत्यांच्या हातून देशसेवा घडावी गोरगरीबाची सेवा घडावी अशी प्रार्थना भगवान पांडुरंगा चरणी करणारं आहे, असे देवगड देवस्थानचे भास्करगिरी महाराज म्हणाले.

LEAVE A REPLY

*