देवगड सारखेच पंढरपूर येथेही काम होईल : गडाख

0
देवगड फाटा (वार्ताहर)- भास्करगिरी महाराज यांनी श्रीक्षेत्र देवगड येथे जसे काम केले तसेच काम त्यांच्या हातून पंढरपूर येथेही होईल अशा शुभेच्छा माजी आमदार शंकरराव गडाख यांनी श्रीक्षेत्र देवगडचे महंत भास्करगिरी महाराज यांना दिल्या.
भास्करगिरी महाराज यांची श्रीक्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानवर निवड होऊन त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काल त्यांनी भास्करगिरी महाराज यांचा मडकी येथे सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते.
शंकरराव गडाख म्हणाले, देवगड परिसरात भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक, सामाजिक कामे होत असतात.आमदार असताना धार्मिक कामासाठी एकाच वेळी सर्वात मोठा निधी आणला होता.
यावेळी मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब शेळके, बाळासाहेब पाटील, कैलास झगरे, पंचायत समिती सदस्य रवी शेरकर, राजेंद्र उंदरे, पिनू जगताप, आप्पासाहेब वरखडे, अजय साबळे, उपसरपंच भीमाशंकर वरखडे, सोसायटी अध्यक्ष विजय चखंडे, अशोक लबडे, ग्रामसेवक श्री. शेळके, पोपट लबडे, बाळासाहेब लबडे, संजय चावरे, बबन लबडे, गोपीचंद लबडे, गोरक्षनाथ लबडे, राजेंद्र मुंगसे, अशोक रुपनर, संभाजी लबडे, नामदेव लबडे आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*