Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या राजकीय

राज्यात भाजप विरोधी बाकावर; देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड

Share

मुंबई | प्रतिनिधी 

प्रयत्नांची पराकाष्ठा करून बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरलेल्या भाजपने अखेर विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय आज घेतला. भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेता म्हणून आज निवड करण्यात आली.

अजित पवारांना हाताशी धरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, अवघ्या चार दिवसातच फडणवीस यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली.

सर्वोच्च न्यायालयाने आज (दि. २७) सायंकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, अजित पवारांसोबत असलेले एक-एक आमदार शरद पवारांनी आपल्या गोटात बोलावले. त्यामुळे अजित पवार एकटे पडले. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर अवघ्या तासाभरात देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकार परिषद बोलावत राजीनाम्याची घोषणा केली.

अवघ्या चार दिवसांत भाजप सरकार कोसळल्यानंतर महाविकास आघाडीने सत्ता स्थापन करण्याचा दावा केला. आज विधासाभेचा विशेष अधिवेशन बोलावून नवनिर्वाचित आमदारांचा शपथग्रहण सोहळा पार पडला. उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ शिवतीर्थावर घेणार आहेत. तर दुसरीकडे भाजपच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड भाजपकडून करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!