Type to search

maharashtra आवर्जून वाचाच मुख्य बातम्या

राज्य सरकारकडून 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा

Share

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अखेर राज्यातील १८० तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती असल्याची घोषणा केली आहे. ही दुष्काळसदृश परिस्थिती निवारण्यासाठी फडणवीस यांनी ८ सूत्री कार्यक्रमांचीही घोषणा केली असून त्याच्या अंमलबजावणीस सुरुवात झाल्याचंही स्पष्ट केलं.

दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा करण्यात आल्याने केंद्राची टीम लवकरच महाराष्ट्रात दाखल होऊन पाहणी करणार आहे. त्यानंतर मदतीची घोषणा करण्यात येईल. दरम्यान दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी ज्या उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत त्यामध्ये जमीन महसुलातून सूट, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या बिलात सूट, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परिक्षा शुल्कात सूट, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात सूट, पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात टँकर योजना, टंचाईग्रस्त गावातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे यांचा समावेश आहे.

राज्यातील या १८० तालुक्यात केंद्राचं पथक येऊन पाहणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच राज्यात सरासरीच्या केवळ ७७ टक्के पाऊस झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, विरोधी पक्षांकडून सातत्याने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात होती. भाजपचा सत्तेतील मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेनेही दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करतानाच रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर फडणवीस यांनी आज ही घोषणा केली.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!