Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याफडणवीसांच्या नव्या मंत्रिमंडळात 'या' चेहऱ्यांना मिळणार संधी?

फडणवीसांच्या नव्या मंत्रिमंडळात ‘या’ चेहऱ्यांना मिळणार संधी?

मुंबई । Mumbai

ठाकरे सरकार (Thackeray government) कोसळल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झाले आहे. त्यातच भाजपमध्ये (bjp) नव्या सरकारच्या स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यापूर्वी फडणवीस हे शिवसेनेसोबत युती करून मुख्यमंत्री झाले होते. आता शिवसेनेतीलच एकनाथ शिंदे गटासोबत भाजप सत्तास्थापनेसाठी युती करणार आहे…

- Advertisement -

भाजप सरकारला शिंदे गटाच्या (shinde group) ५० आमदारांचा (mla) पाठिंबा असल्याने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता असून शिंदे गटातील १३ ते १४ जणांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते. तर मागच्या फडणवीस सरकारमधील २७ पैकी २३ ते २४ जणांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

फडणवीसांच्या संभाव्य नव्या मंत्रिमंडळात भाजपकडून कॅबिनेट मंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, प्रविण दरेकर, आशिष शेलार, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण,राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, संभाजी पाटील निलंगेकर, चंद्रशेखर बावनकुळे, प्रसाद लाड, यांना संधी मिळू शकते. तर राज्यमंत्रिपदासाठी नितेश राणे, प्रशांत ठाकूर, मदन येरावर, निलय नाईक, गोपीचंद पडळकर,अतुल सावे,राम सातपुते, यांची नावे चर्चेत आहे.

तसेच शिंदे गटाकडून कॅबिनेट मंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे,अब्दुल सत्तार,संजय राठोड, शंभूराजे देसाई, दीपक केसरकर, संदीपान भुमरे, तानाजी सावंत,बच्चू कडू, यांना संधी मिळू शकते. तर राज्यमंत्रिपदासाठी भरत गोगावले, राजेंद्र यड्रावकर, लता सोनवणे, मंजुळा गावित, सुहास कांदे, संजय शिरसाट, शहाजी बापु पाटील, यांची नावे चर्चेत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या