कर्जमुक्तीसाठी जुलै पर्यंत ‘कट ऑफ  डेट’ धरावा – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई :  कर्जमुक्तीचा लाभ ख-या अर्थाने शेतक-याला व्हायचा असेल तर कट ऑफ  दिनांक हा जुलैपर्यंत धरावा अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते  देवेद्र फडणवीस यांनी आज विधानसभे्त केली. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी दिशा कायदा धर्तीवर कायदा करण्याचा हेतू चांगला आहे. मात्र  त्याची प्रभावी अमंलबजावणी व्हावी अशीही काळजी घ्या अशीही सूचना त्यांनी केली.

विरोधी पक्षांचा रा्ज्यातील शेती व शेतक-यांचे प्रश्व तसेच राज्यातील वाढते महिला अत्याचार यासंबंघी नियम-293 अन्वये प्रस्ताव  मांडताना फडणवीस बोलत होते.  शेतकरू आपले उत्पादन घेऊन तीन- तीन कि.मी. रांगा लावून 4 -4दिवस वाट पाहात आहेत. त्यांच्या उत्पादनाच्या खरेदीची व्यवस्था करा.

अन्यथा ते दलालांच्या तावडीत सापडतील असा इशाराही त्यांनी दिला. ज्यांना कर्जमाफी मिळते त्यांना पुन्हा कर्ज देण्यात बॅंका अडचणी निर्माण करतात याकडेही त्यांनी लक्ष वेधले. कर्जमाफी म्हणजे दुखणे ढोपराला उपाय गुढघ्याला अशी टीका एक मंत्रीच करतात  असेही ते म्हणाले.

राज्यातील महिलांवर अत्याचार वाढत आहेत त्याबात आकडेवारी सांगतानाच हिंगणघाट ये्थील युवतीला जाळण्याची घटना व एका अभिनेत्रीशी छेडछाड करण्याचा प्रयत्न या घटनांचा उल्लेखही त्यांनी केला. नवे गृहमंत्री नागपूरचे असल्यांमुळे आता नागपूरचा उल्लेख क्राइम कॅपिटल असा होणार नाही अशी आशा आहे असेही ते म्हणाले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *