Thursday, April 25, 2024
Homeनगरमाझा साईबाबांवर अतूट विश्वास आहे – देवेगौडा

माझा साईबाबांवर अतूट विश्वास आहे – देवेगौडा

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – माझा साईबाबांवर अतूट विश्वास आहे. साईबाबांकडेे प्रार्थना केली आहे. दरम्यान कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस प्रणीत आघाडी सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करू न शकल्याने गडगडले होते. काँग्रेस जेडीएसच्या 15 आमदारांच्या राजीनाम्याने हे सरकार अल्पमतात गेले होते. त्यानंतर सरकारला वाचविण्यासाठी परस्परांना चितपट करण्यासाठी राजकीय डावपेच टाकले जात होते. परंतु यात राजकारणात भाजपाने सत्तास्थापन केली. या पोटनिवडणुकीत आजच्या निकालावरच पुढील राजकीय दिशा ठरणार असल्याचेही जनता दल पक्षाचे देशाचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी सांगितले.

कर्नाटक विधानसभेचा पोटनिवडणुकीचा आज निकाल असूूून या पोटनिवडणुकीत कोणत्या पक्षाची हार-जीत होते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असताना जनता दल पक्षाचे देशाचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी रविवारी सायंकाळी साईदरबारी धुपारतीला हजेरी लावत साईसमाधीचे मनोभावे दर्शन घेतले. निकालाच्या आदल्या दिवशी दर्शन घेतल्यामुळे सर्वधर्म समभावाचे प्रतिक असलेल्या साईबाबांना काय साकडे घातले याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहे. यावेळी त्यांना महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबाबत विचारले असता त्यांनी याबाबत बोलणे टाळले. याप्रसंगी त्यांचा साईबाबा संस्थानच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या हस्ते समाधीवर शाल चढविण्यात आली.

- Advertisement -

यावेळी विश्वस्त बिपीन कोल्हे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, उपविभागीय पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शिर्डी शहर यांच्यावतीने माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष रमेश गोंदकर, तालुका उपाध्यक्ष सुधाकर शिंदे, चंद्रकांत गोंदकर, राष्ट्रवादी युवकचे शिर्डी शहराध्यक्ष दीपक गोंदकर, प्रकाश गोंदकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

साईबाबा संस्थानचे भाजपचे विश्वस्त बिपीन कोल्हे माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या स्वागतासाठी मंदिराच्या गेट नंबर दोनवर हजर झाल्याने अनेक राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहे. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांनी बिपीन कोल्हे यांना कोणता राजकीय कानमंत्र दिला. याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. राजकीय सारीपाटात कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते. याचाच प्रत्यय काल शिर्डीत बघायला मिळाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या